नवी दिल्लीत तीन दिवस मुक्कामी असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चंद्रकांत पाटील यांना भेट नाकारल्यामुळे वेगवेगळ्या चर्चेंना ऊत आला होता. मुंबईत परतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.
‘महाराष्ट्रातील नवीन आणि जुन्या मंत्र्यांची भेट व्हावी अशी प्रथा होती. ती कोरोनामुळे थांबली होती. त्यामुळे नवे आणि जुने सर्व मंत्र्याकडे भेटी झाल्या. त्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या, त्यांच्याकडून काम जाणून घेतले. त्यांच्या मंत्रिपदाचा राज्याला काय फायदा होईल हे जाणून घेतले. त्यातून राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेटणे ठरले. पण या प्रवासाला खूप महत्त्व आले. काल रात्री सर्व आमदार आणि मंत्र्यांचे स्नेहभोजन झाले. ही नियमित भेट होती. परंतु, या प्रवासात तुम्ही शोधत होतात की कोण भेटले नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा भेटले नाही. त्यांच्याकडे आमचे काही काम नव्हते. पंधरा दिवसांपूर्वी आम्ही पत्र लिहिले होते, असा खुलासा पाटील यांनी केला.
स्टार क्रिकेटपटू लढतोय आयुष्याची लढाई, रुग्णालयात लाईफ सपोर्ट सिस्टीमवर
‘जगतजी यांची भेट ठरली होती. लोकसभेचे कामकाज सुरू होत नव्हते. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, त्यामुळे ते त्या टेन्शनमध्ये होते त्यात आपलं काय काम तर नमस्कार करणे एवढंच होतं. लगेच त्यावर बातम्या सुरू झाल्या, चार दिवस सगळे नेते एकमेकांना भेटले, पण अमित शहा भेटले नसल्यामुळे बातम्या सुरू झाल्या’, असंही पाटील म्हणाले.
‘देवेंद्र फडणवीस हे साधारण: पणे 8 दिवसांतून दिल्लीला जात असतात. राज्यातील काही प्रश्न असले की ते दिल्लीला जात असतात. त्यांची सुद्धा ती भेट पण लोकसभेत झाली. त्यामुळे असं काही नाही की अमित शहा देवेंद्र फडणवीस यांना भेटतात आणि मला भेटत नाही, अनावश्यक चर्चा होते म्हणून मी स्पष्टीकरण देतो’, असंही पाटील म्हणाले.
‘संघटनात्मक प्रमुख जे पी नड्डा यांनी भेट नाकारली असती तर गोष्ट वेगळी होती. पण, तसं काही झालं नाही. मनसेचे नेते राज ठाकरे यांना भेट घेतली त्याबद्दल वरिष्टांना माहिती दिली आहे, असंही पाटील म्हणाले.
‘आमच्या कल्चरची वाट आधीच लागली होती. जेव्हा आम्ही धान्याची दुकान बंद ठेवली आणि रेवेन्यूसाठी दारूची दुकाने खुली ठेवली. हा प्रकार गंभीर आहे.मुख्यमंत्री यांनी या प्रकारची गंभीर दखल घेतली पाहिजे, या सरकारमध्ये काहीच आंदोलन केल्याशिवाय, रोष व्यक्त झाल्याशिवाय होत नाही. १५ टक्क्यांच्यावर बदल्या होऊ नये असा नियम आहे. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे पण गेल्या दीड वर्षात त्यांनी एकाही पत्राला उत्तर दिले नाही. तसे ते यालाही देणार नाही. त्यामुळे मी कोर्टात जाणार, असंही पाटील म्हणाले.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#अमत #शहच #भट #क #झल #नह #अखर #चदरकत #पटलन #दल #सपषटकरण