अपूर्वानं तिच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती अंतराळवीराच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. हे फोटो शेअर करत अपूर्वानं लिहिलंय, ‘ दूषित विचार असलेल्या हवेत श्वास घेणं फार कठीण आहे. मला मोकळी जागा हवी आहे’. या कॅप्शनसह अपूर्वानं #Realitycheck असा हॅशटॅगही शेअर केला आहे. अपूर्वानं अशी पोस्ट का लिहिली असावी असा प्रश्न देखील तिच्या चाहत्यांना पडला आहे. मात्र तिचे कमाल फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत.
अपूर्वानं तिची आई, बहिण आणि भाचीबरोबर वरळीच्या नेहरु सेंटरला भेट दिली. तिथे तिनं हे फोटो काढले आहेत.
हेही वाचा – Tu Tevha Tashi: अनामिकाच्या आईचं अस्खलित हिंदी ऐकलंत का? हसून हसून डोळ्यात येईल पाणी!
अपूर्वानं अंतराळवीराच्या वेशात फोटो काढला आहे. अपूर्वानं तिच्या पुढच्या पोस्टमध्ये आई, बहिण आणि भाची यांच्याबरोबर व्हिडीओ शेअर करुन ‘माझी श्वास घेण्याची जागा’ असं म्हटलं आहे. फिरुन झाल्यानंतर अपूर्वानं भाची अदिकाबरोबर धम्माल मस्ती देखील केली. अपूर्वाने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अपूर्वा तिच्या फॅमिलीबरोबर फार कनेक्टेड आहे. अपूर्वाचं लग्नही झालं आहे मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आल्याचं म्हटलं जात आहे. अपूर्वाच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर अपूर्वा सध्या कोणत्याच टेलिव्हिजन प्लॅटफॉर्मवर दिसत नाहीये पण ती तिच्या अपकमिंग प्रोजेक्टवर काम करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#अभनतर #अपरवल #नमळकरल #य #ठकण #शवस #घण #हत #कठण #हवय #मकळ #जग