Saturday, July 2, 2022
Home करमणूक अभिनेत्रीनं चोरला हाॅलिवूड सेलिब्रिटीचा नाश्ता, ट्विटरवर उडवली जातेय खिल्ली

अभिनेत्रीनं चोरला हाॅलिवूड सेलिब्रिटीचा नाश्ता, ट्विटरवर उडवली जातेय खिल्ली


मुंबई : सध्या पाकिस्तानी अभिनेत्री मीनल खान चर्चेत आहेत. मीनल खान टीव्ही मालिकांमध्ये लोकप्रिय आहे. मीनल आणि तिचे पती एहसान मोहसीन नेहमीच अॅडव्हेंचर ट्रिपसाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा मीनल खान इन्स्टाग्रामवर आपले पर्यटनाचे फोटो शेअर करत असते. त्यात एकदम श्रीमंती नाश्ता, लंच, डिनर असे फोटोही असतात. तिच्या चाहत्यांमध्ये ती लोकप्रिय आहे. पण यावेळी मीनलच्या हातून एक भली मोठी चूक झाली.

रणबीरनं ‘शमशेरा’मध्ये पुन्हा एकदा ‘सावरियां’चा टाॅवेल सीन केलाय? हा Video पाहाच

मीनल खाननं इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केलेले फोटो हे अमेरिकन माॅडेल आणि अभिनेत्री काइलीच्या स्टोरीसारखेच होते. त्याचं झालं असं, काइली जेनरनं ब्रेकफास्टचा फोटो शेअर केला. तो एकदम भव्य, श्रीमंती असा ब्रेकफास्ट होता. अगदी तंतोतंत तसाच फोटो मीनलनंही आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. फॅन्सना ते लक्षात यायला फारसा वेळ लागला नाही. मग काय, सोशल मीडियावर मीनलला टीकेला सामोरं जावं लागलं.

मीनल खान सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे फॅन फाॅलोइंगही खूप आहेत. ती नेहमीच विविध फोटो टाकत असते. पण यावेळी तिचा हा काॅपी केलेला फोटो अनेकांच्या लक्षात आला. मीनलनं आतापर्यंत शेअर केलेले फोटो तिने काढलेले आहेत की काॅपी केलेले, हा प्रश्न आता अनेकांना पडलाय. कदाचित पाकिस्तानात काइली जेनरला कुणी फाॅलो करत नसेल, असं मीनलला वाटलं असावं.

फोटोत ब्रेकफास्टचा मोठा ट्रे आहे. त्यात स्ट्राॅबेरी, चेरी, पपई, आंबा, ड्रॅगन फ्रूट अशी फळं दिसतायत. शिवाय फ्रुट सॅलडसारखा पदार्थही आहे. फोटोमध्ये काइली एअर असंही लिहिलं आहे. हा फोटो इतका चर्चेचा विषय होईल, हे मीनल खानलाही वाटलं नसावं.

राजकीय वातावरण तापलं असताना सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

मजा-मस्ती अन् बरंच काही…सिद्धार्थ – मितालीची लंडन ट्रीपअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#अभनतरन #चरल #हलवड #सलबरटच #नशत #टवटरवर #उडवल #जतय #खलल

RELATED ARTICLES

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

Most Popular

पंत-जडेजाचा काऊंटर अटॅक; इंग्लंड गोलंदाजांना शिकवला चांगलाच धडा, असा केला पलटवार

मुंबई : इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन येथे सुरु झालेल्या पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवशी ७ बाद ३३८ धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ...

Wrong Fruit Combination : सावधान, फळांसोबत ‘हे’ 5 पदार्थ खाल्ल्यास पोटात बनतं विष, चुकूनही एकत्र खाऊ नका, जीव येईल धोक्यात..!

फळे ही अशी गोष्ट आहे जी पृथ्वीवरील सर्वात आरोग्यदायी आणि शक्तिशाली गोष्ट मानली जाते. आरोग्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची जीवनसत्त्वे (vitamins) आणि खनिजे...

Pune Crime News: धक्कादायक! शाळेतून घरी येताना 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

Pune Crime News: पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात गुरुवारी शाळेतून घरी जात असताना एका व्यक्तीने 11 वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा...

आता Smartphone वर करता येईल कमाई, या Apps चा वापर करुन पैसे कमावण्याची संधी

नवी दिल्ली, 1 जुलै : सध्याच्या काळात इंटरनेट आणि स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच गोष्टी ऑनलाइन करता येतात....

7 दिवसात बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 50 कोटींहून अधिक कमाई

मुंबई, 01 जुलै: वरूण धवन ( varun dhawan)  कियारा अडवाणी (  kiara advani)  नीतु कपूर ( Neetu Kapoor) आणि अनिल कपूर ( Anil Kapoor) यांच्या...

गर्भपात क्लिनिकला भेट देणाऱ्या व्यक्तीची ‘लोकेशन हिस्ट्री’ गुगल हटवणार!

Right To Abortion : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने (US Supreme Court) गर्भपाताला कायदेशीर मान्यता देणारा 50 वर्षे जुना निर्णय...