नवी दिल्ली : साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह अससतात. प्रत्येक मुद्द्यावर ते आपले मत मांडताना दिसतात. प्रकाश राज यांनी आता ट्वीट करून त्यांना झालेल्या दुखापतीची माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. पडल्यामुळे त्यांना छोटंस फ्रॅक्चर झालं आहे. यावर उपचारासाठी ते हैदराबादला त्यांच्या डॉक्टर मित्राकडे गेले आहेत. प्रकाश राज यांच्या या ट्वीटनंतर त्यांच्या चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. चाहते त्यांची प्रकृतीत लवकरात लवकर बरी होण्याची आशा व्यक्त करत आहेत.
A small fall.. a tiny fracture.. flying to Hyderabad into the safe hands of my friend Dr Guruvareddy for a surgery. I will be fine nothing to worry .. keep me in your thoughts 😊😊😊🤗🤗🤗
— Prakash Raj (@prakashraaj) August 10, 2021
प्रकाश राज यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, माझा छोटासा अपघात झाला आहे. यामध्ये फ्रॅक्चर झाले आहे. आता मी हैदराबाद येथील माझे डॉक्टर मित्र डॉ. गुरुदेवा रेड्डी यांच्याकडे उपचारासाठी जात आहे. तिथे माझ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही, मी ठीक आहे.
प्रकाश राज दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील मोठं नाव आहे. बॉलिवूडमध्ये त्यांची सिंघम सिनेमातील जयकांत शिक्रे ही भूमिका प्रचंड गाजली. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये काही सिनेमे केले. काही दिवसांपूर्वीच प्रकाश राज यांचा नेटफ्लिक्सवर ‘नवरस’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. याशिवाय त्यांचे अनेक सिनेमे आगामी काळात रिलीज होणार आहेत. यामध्ये केजीएफ 2, पोन्नीयन सेल्वम, पुष्पा या बिग बजेट सिनेमांचा समावेश आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#अभनत #परकश #रज #छटश #अपघतत #जखम #टवट #करत #महटल #दआओ #म #यद #रखन