Thursday, May 26, 2022
Home करमणूक अभिनेता अक्षय कुमार पुन्हा कोरोनाच्या विळख्यात; वर्षभराने पुन्हा व्हायरसने गाठलं

अभिनेता अक्षय कुमार पुन्हा कोरोनाच्या विळख्यात; वर्षभराने पुन्हा व्हायरसने गाठलं


मुंबई, 14 मे :  अभिनेता अक्षय कुमार पुन्हा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे (Akshay Kumar Covid positive). अभिनेत्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. अक्षय कुमारला दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. कोरोनामुळे त्याची कान्स वारीही हुकली आहे (75th Cannes Film Festival). अक्षयने स्वतःच आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. त्याने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
17 मेपासून 75 वं कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू होत आहे. कान्स फेस्टिव्हलमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी म्हणून अक्षय कुमारही जाणार होता. त्याने या दिवसाची आतुरतने वाट पाहिली होती. पण कान्स फेस्टिव्हल तोंडावर असतानाच अक्षय कुमारला कोरोनाने गाठलं. त्यामुळे तो आता कान्स फेस्टिव्हलला जाऊ शखणार नाही.
अक्षय कुमारने ट्विट केलं आहे की, “कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या फिल्मचं मूळ रोवण्यासाठी खूप उत्सुक होतो. पण दुर्दैवाने कोरोना पॉझिटिव्ह झालो. पण संपूर्ण टीमसाठी खूप शुभेच्छा. खूप मिस करेन”

अक्षय कुमारला याआधीही कोरोना झाला आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याला कोरोना झाला होता. यावेळी राम सेतू फिल्मची शूटिंग सुरू होती. अक्षयसह इतर क्रू मेंबर्सनाही कोरोना झाल्याने काही कालावधीसाठी सिनेमाचं शूटिंगही थांबवण्यात आलं होतं.
हे वाचा – ‘ज्येष्ठ नेत्याबद्दल काय भाषा वापरतो याचे भान पाहिजेत’ देवेंद्र फडणवीस केतकी चितळेवर भडकले
कोरोनाची एकदा लागण झाल्यानंतर पुन्हा लागण होऊ शकते. अशी बरीच प्रकरणं समोर आली आहेत. याआधी सौरव गांगुली, माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनाही दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती.
पुन्हा कोरोनाचा संसर्ग का होतो आणि तो  किती धोकादायक?
कोरोनाचा पुन्हा संसर्ग होणं याबाबत केम्ब्रिज विद्यापीठाने अभ्यास केला. ज्यात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चसह (ICMR) जगभरातल्या आणखीही काही संस्थांचाही समावेश होता. या अभ्यासानुसार एकदा कोरोना संसर्ग होऊन गेल्यानंतर शरीरात त्यासाठी अँटीबॉडीज (Antibodies) विकसित होतात. त्यामुळे विषाणूचा पुन्हा हल्ला झाल्यास त्या विषाणूला निष्प्रभ केलं जातं. काही जणांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने सक्षम अँटीबॉडीज विकसित होत नाहीत. त्यामुळे पुन्हा संसर्ग होऊ शकतो. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) कमकुवत असते आणि ज्यांचं शरीर कोरोनाविरोधात तगडी प्रतिकारशक्ती विकसित करू शकत नाही, वयस्कर व्यक्ती, तसंच थॅलेसेमियासारख्या विकारांशी लढत असलेल्या व्यक्तींना दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग होण्याचा धोका असतो.
हे वाचा – Diabetes असला तरी ही 5 फळं खायला हरकत नाही; Sugar Level सुद्धा नियंत्रणात राहिल
ICMRच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे, की पहिल्या संसर्गापेक्षा दुसऱ्यांदा संसर्ग (Reinfection) झाल्यास अधिक बिकट परिस्थिती उद्भवते. पहिल्यांदा संसर्ग झालेला असताना लक्षणं दिसली नसली, तर शरीर अँटीबॉडी पूर्ण तऱ्हेने लक्षात ठेवू शकत नाही. त्यामुळे कोरोनाचा दुसऱ्यांदा हल्ला झाला, तर शरीर जोरदार प्रतिकार करू शकत नाही.
दुसऱ्यांदा संसर्ग होणं कसं टाळता येईल?
तरुण असाल, वृद्ध असाल, लस घेतलेली असेल किंवा नसेल, पण मास्क (Mask), स्वच्छता, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) या गोष्टी पाळण्याला पर्याय नाही. त्यामुळेच दुसऱ्यांदा संसर्ग होण्यापासून बचाव होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#अभनत #अकषय #कमर #पनह #करनचय #वळखयत #वरषभरन #पनह #वहयरसन #गठल

RELATED ARTICLES

‘हाय का, पुन्हा याच्या नशिबात दोन बायका!’ नव्या मालिकेमुळे अभिजीत खांडकेकर ट्रोल

मुंबई, 26 मे:  'माझिया प्रियाला प्रीत कळेना' (Maziya Priyala Preet Kalena) मालिकेतून मालिका क्षेत्रात पदार्पण करणारा सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे 'अभिजीत खांडकेकर' (Abhijeet...

सलग 13 तासांच्या चौकशीत ईडीने काय प्रश्न विचारले? अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 26 मे : ईडी (ED) अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर धाड (ED Raid) टाकली. ईडीने परब...

Infosys चे CEO सलील पारेख यांची पगारवाढ बघून चक्रावून जाल; इतकं मिळालं Hike

मुंबई, 26 मे: जगभरातील टॉप कंपन्या आणि त्यांच्या CEO ना मिळणाऱ्या पगाराबद्दल आपल्याला माहितीच आहे. या कंपन्यांमध्ये अनेक IT कंपन्यांचा नंबर लागतो. यामध्ये...

Most Popular

Sunburn घालवायचाय? ‘हे’ उपाय करून मिळवा Skin Tanning पासून सुटका

मुंबई : उन्हाळ्यामध्ये म्हणा, किंवा साधं उन्हाच्या वेळांमध्ये फिरल्यामुळे म्हणा. त्वचा काळवंडते आणि मग नकळतच आपण या गोष्टीचाही ताण घेतो. शरीराचे जे भात...

एलिमिनेटर सामन्यात बंगळुरुचा लखनऊवर थरारक विजय, क्वॉलिफायर-२ मध्ये राजस्थानसोबत करणार दोन हात

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेमध्ये आज एलिमिनेटर लढत खेळवली गेली. लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघांमध्ये खेळवलेल्या...

आम्ही देखील पाहून घेऊ, ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचा इशारा

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या निवासस्थानी ईडीकडून धाड टाकण्यात आली. यासोबतच अनिल परबांच्या...

Infosys चे CEO सलील पारेख यांची पगारवाढ बघून चक्रावून जाल; इतकं मिळालं Hike

मुंबई, 26 मे: जगभरातील टॉप कंपन्या आणि त्यांच्या CEO ना मिळणाऱ्या पगाराबद्दल आपल्याला माहितीच आहे. या कंपन्यांमध्ये अनेक IT कंपन्यांचा नंबर लागतो. यामध्ये...

Menopause मध्ये पिरीयड्स अचानक बंद होतात? जाणून घ्या काय आहे सत्य

स्त्रिया अनेकदा मेनोपॉजसंदर्भात गोंधळलेल्या असतात. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #Menopause...

भारतात आहे जगातील सर्वात श्रीमंत गाव; प्रत्येकाच्या खात्यात 15 लाखहून अधिक रक्कम

नवी दिल्ली 26 मे : जगात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यात काहीतरी वेगळेपण आहे. तसंच अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांच्याबद्दल लोकांना कमी माहिती...