Saturday, August 13, 2022
Home विश्व अफगाण सैन्य आणि तालिबानमध्ये तीन प्रांतात घनघोर संघर्ष; विमान सेवा बंद

अफगाण सैन्य आणि तालिबानमध्ये तीन प्रांतात घनघोर संघर्ष; विमान सेवा बंद


हेरत: तालिबान आणि अफगाणिस्तानच्या सैन्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. अफगाणिस्तानमधील दक्षिण आणि पश्चिम अफगाणिस्तानमधील तीन प्रांतात घनघोर युद्ध सुरू आहे. तालिबान तीन मोठ्या शहरांवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. तर, अफगाण सैन्यानेही तालिबानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कंबर कसली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादीदेखील तालिबानच्या बाजूने लढण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये दाखल झाल्याचे वृत्त आहे.

अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील हेलमंद प्रांताची राजधानी लष्कर गाहमध्ये तालिबानींनी आत्मघाती हल्ले केले आहेत. या हल्ल्यानंतर सैन्याने अधिक कुमक मागितली आहे. तालिबानने अफगाणिस्तानमधील दुसरे मोठे शहर कंदहारलादेखील लक्ष्य केले आहे. कंदहारमधून विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे. तालिबानने रविवारी कंदहार विमानतळावर रॉकेट हल्लादेखील केला होता. वृत्तसंस्था डीपीएने दिलेल्या माहितीनुसार देशातील अनेक शहरांमधील विमान सेवा स्थगित केली आहे.

रक्तरंजित अफगाणिस्तान; २४ हजार तालिबानी आणि ५००० नागरिकांचा मृत्यू
अफगाणिस्तानमधील हवाई सेवा पुन्हा सुरू करणे अत्यावश्यक आहे. अफगाण सैन्याला हवाई सेवेच्या माध्यमातून मदत पाठवली जात आहे. या दरम्यान, तालिबानने कंदहार, हेरात आणि लष्कर गाह शहराला चारही बाजूने घेरले आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, शहरात तीव्र संघर्ष सुरू आहे. अफगाणिस्तानच्या विशेष सुरक्षा दलाला तैनात करण्याची मागणी करण्यात आली आहे. अफगाण सुरक्षा दलाकडून हवाई हल्ल्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. तालिबानी दहशतवाद्यांना शहरापासून मागे ढकलण्यासाठी हे हल्ले केले जात आहेत.

वाचा: खळबळजनक दावा! ‘या’ कारणांमुळे तालिबानकडून भारतीय पत्रकाराची हत्या

अफगाणिस्तान सैन्याकडून तालिबानच्या ठिकाणांवर रात्रीदेखील हवाई हल्ले सुरू आहेत. हेरात प्रांतात १०० हून अधिक तालिबानी ठार झाल्याची माहिती राज्यपालांच्या प्रवक्त्यांनी दिली.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अफगण #सनय #आण #तलबनमधय #तन #परतत #घनघर #सघरष #वमन #सव #बद

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

National Special Superfast : 12 ऑगस्ट 2022 : स्पेशल सुपरफास्ट : ABP Majha

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #National #Special #Superfast #ऑगसट...

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्समध्ये वाटले गेले तब्बल 1.5 लाख Condoms, पण का?

कॉमनवेल्थच्या आयोजकांनी 12 दिवसांत 1.5 लाख कंडोमचं वाटप केलं होतं. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Girish Mahajan at Jalgaon : मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन यांचं जळगावात जंगी स्वागत

Girish Mahajan at Jalgaon : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन (Girish Mahajan) आज प्रथमच जळगावमध्ये...

बहिणीचा शेवटचा फोन, मुलीचा व्हिडिओ कॉल… राजौरीतील 4 शहीद जवानांची कहाणी

Rajouri Terror Attack: 21 वर्षीय रायफलमन निशांत मलिकने बुधवारी व्हिडिओ कॉलवर हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील हांसी शहरात आपल्या कुटुंबियांशी संवाद साधला. त्याच्या बहिणीने गुरुवारी...

लाल सिंह चड्ढा

आमिर खानच्या नावावर असलेले अनेक चित्रपट हे मुळात इतर भाषांतील चित्रपटांचा रिमेक आहेत किंवा त्या एखाद्या सिनेमाच्या कथानकावरून प्रेरित असलेले आहेत. चोखंदळ असलेला...

हृदयद्रावक! राखी बांधण्यासाठी निघालेल्या बहिणींना यमुनेत जलसमाधी, ४ जणांचा मृत्यू, १७ जण अद्यापही बेपत्ता

बांदा (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात मोठी दुर्घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाला महिला मुलांसोबत राखी बांधण्यासाठी बोटीतून माहेरी जात असताना यमुना...