Saturday, November 27, 2021
Home विश्व अफगाण सैन्याचे विमान 'या' देशाने पाडले?; २२ विमाने, २४ हेलिकॉप्टरची घुसखोरी

अफगाण सैन्याचे विमान ‘या’ देशाने पाडले?; २२ विमाने, २४ हेलिकॉप्टरची घुसखोरी


ताश्कंद: अफगाणिस्तानच्या सत्तेचा ताबा तालिबानने घेतल्यानंतर अफगाण अधिकारी, नागरिकांनी देश सोडून जाण्यास सुरुवात केली. अफगाणिस्तानमधून काही जेट विमाने, हेलिकॉप्टरमधून अनेकांनी पलायन केले असल्याचे म्हटले जाते. अशातच उझबेकिस्तानने मोठा दावा केला आहे. अफगाण सैन्याचे एक लष्करी विमान पाडले असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे विमान अफगाण हवाई दलाचा पायलट चालव होता अशी माहिती उझबेकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिली.

उझबेकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांमध्ये अफगाण नॅशनल आर्मीच्या जवानांनी सीमा ओलांडून घुसखोरी केली आहे. तालिबानच्या हल्ल्यानंतर अफगाण हवाई दलाचे २२ जेट आणि २४ हेलिकॉप्टरने उझबेकिस्तानच्या सीमेत घुसखोरी केली असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

विमानातही भयंकर परिस्थिती; १३४ प्रवासी क्षमता असलेल्या विमानात ८०० जण!
काबूल: दूतावासातील कर्मचाऱ्यांसह भारतीय हवाई दलाचे विमान दिल्लीसाठी रवाना
उझबेकिस्तान संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या लष्करी विमानाने अवैधपणे देशात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एअर डिफेन्स सिस्टीमने विमानाला पाडले. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली असल्याचे म्हटले जाते. अफगाणिस्तान-उझबेकिस्तान सीमेलगतच्या सुरखोनडायरो प्रांतात विमान पाडले. या विमानातील प्रवशांबाबत, जीवितहानीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

वाचा:अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर अमेरिकेने अखेर मौन सोडलं; बायडन म्हणतात…

‘एएफपी’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सुरखोनडायरो प्रांतातील डॉक्टर बेकपुलट ओकबोयेव यांनी सांगितले की, अफगाणी सैन्याचा गणवेश असलेल्या दोघांना रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील एका व्यक्तीजवळ पॅराशूट होता. त्याच्या पायाचे हाड मोडले असल्याचे त्यांनी सांगितले.

मोठ्या संख्येने अफगाण जवान उझबेकिस्तानच्या सीमेत अवैधपणे प्रवेश करत आहेत. त्यापैकी ८४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय सीमा अवैधपणे ओलांडली असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. अफगाणिस्तानचे सैन्य मोठ्या प्रमाणावर ताजिकिस्तान, इराण आणि पाकिस्तानमध्येही जात असल्याचे समोर आले आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अफगण #सनयच #वमन #य #दशन #पडल #२२ #वमन #२४ #हलकपटरच #घसखर

RELATED ARTICLES

वाईट! दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून केली दगडफेक, 12 जण जखमी

राजस्थान, 27 नोव्हेंबर: राजस्थानची (Rajasthan)राजधानी जयपूर (Jaipur) ग्रामीणमधील पावटा भागात गुरुवारी रात्री उशिरा गोंधळ झाला. दलित व्यक्तीच्या वरातीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली...

Parambir Singh : परमबीर सिंहांची आता सीआयडी चौकशी! मुंबईत दाखल होताच चौकशीचा ससेमिरा

Parambir Singh : मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह (Parambir Singh)यांना आता सीआयडी...

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Most Popular

श्रेयस अय्यरनं शतक झळकात पूर्ण केली अट, आता घरी जेवायला येणार खास पाहुणा

कानपूर, 27 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरनं शतक (Shreyas Iyer)...

लस घेऊनही एवढ्या टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज नाहीत!

ठाण्यातही महापालिकेच्या सेरो सर्वेचा दिलासादायक अहवाल समोर आला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

वाईट! दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून केली दगडफेक, 12 जण जखमी

राजस्थान, 27 नोव्हेंबर: राजस्थानची (Rajasthan)राजधानी जयपूर (Jaipur) ग्रामीणमधील पावटा भागात गुरुवारी रात्री उशिरा गोंधळ झाला. दलित व्यक्तीच्या वरातीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली...

अमिताभ बच्चन ‘वाईट व्यक्ती’ करीनाचा समज, बिग बींनी पाय धुतल्यानंतर बदललं मत

असं काय झालं की चक्क बिग बींना करीनाचे पाय धुवावे लागले, त्यानंतर करीनाचं बदललं मत    अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

नवीन कोरोना व्हायरस ‘चिंतेचा’, WHOनं दिलं ‘हे’ नाव, धोका अधिक!

Omicron B.1.1.529 : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे....

Petrol, Diesel Price : दिवाळीपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती जैसे थे

Petrol, Diesel Price Today, Petrol Diesel Rate 27 November : देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती सलग 25व्या दिवशी बदललेल्या नाहीत....