Saturday, November 27, 2021
Home भारत अफगाणिस्तानात उलटापालट : भारताच्या तत्काळ ई-व्हिसासाठी असा दाखल करा अर्ज

अफगाणिस्तानात उलटापालट : भारताच्या तत्काळ ई-व्हिसासाठी असा दाखल करा अर्ज


हायलाइट्स:

  • सर्व भारतीय आणि अफगाणी नागरिकांना अर्ज दाखल करण्याची मुभा
  • धर्माचं बंधन आड येणार नाही
  • जाणून घ्या… ई अर्ज दाखल करताना कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारनं भारतात दाखल होण्यासाठी आपात्कालीन ई व्हिसाची घोषणा केलीय. भारतात प्रवेश मिळवण्यासाठी आणि व्हिसासाठी दाखल होणारे अर्जांची तेजीनं हाताळणी करण्यासाठी ही व्यवस्था कार्यरत करण्यात आलीय. सध्या अनेक विद्यार्थी, कामगार, मजूर वर्गातील भारतीय अफगाणिस्तानातील बिघडलेल्या वातावरणात अडकून पडले आहेत. या ई व्हिसासाठी अफगाणिस्तानचे नागरिकही आपला अर्ज दाखल करू शकतात. या आपात्कालीन योजनेंतर्गत येत्या सहा महिन्यांसाठी व्हिसा जारी केला जाईल, असं सांगण्यात येतंय. सुरक्षेचे मुद्दे ध्यानात घेता ही व्यवस्था काम करणार आहे.

‘ई-व्हिसा’साठी कोणत्याही धर्माचे लोक अर्ज दाखल करू शकतात

सर्व भारतीय आणि अफगाणी, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, ते ई-व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील. त्यांच्या अर्जांबाबत नवी दिल्लीत पुढील प्रक्रिया केली जाईल. ‘अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहता व्हिसाबाबतच्या तरतुदींचा आढावा घेतला जात आहे. भारतात प्रवेश देण्याकरिता व्हिसा प्रक्रिया जलद व्हावी म्हणून ‘ई इमर्जन्सी एक्स मिस व्हिसा’ अशी इलेक्ट्रॉनिक व्हिसाची नवी श्रेणी सुरू करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयातील प्रवक्त्यांनी दिलीय. हे व्हिसा सुरुवातीला सहा महिन्यांकरीता वैध असतील. अफगाणी नागरिकांना व्हिसा जारी करताना सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेतली जाईल, असंही यावेळी सांगण्यात आलंय.

afghanistan crisis : ‘भारतीयांना सुरक्षित बाहेर काढा, अल्पसंख्यकांना मदत करा’, PM मोदींचे निर्देश
pm modi chairs ccs meeting : अफगाणिस्तानवर PM मोदींची उच्चस्तरीय बैठक; गृह, संरक्षण, अर्थमंत्र्यांसह NSA उपस्थित
कसा दाखल करणार अर्ज

– indianvisaonline.gov.in/evisa/Registration वर क्लिक करा

– त्यानंतर Emergency X-Misc Visa या ऑप्शनवर क्लिक करा

– लिंक अॅप्लिकेशन पेजवर रिडायरेक्ट करत नसेल तर होमपेजवर उपलब्ध असलेल्या For eVisa by Bureau of Immigration, Apply here या ऑप्शनवरही तुम्ही क्लिक करू शकता

– त्यानंतर Apply here for e-visa या पर्यायावर क्लिक करा

– अॅप्लिकेशन पेजवर आवश्यक माहिती भरल्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांची लिस्ट पॉप-अपवर दिसेल

– उरलेला फॉर्म भरताना रेफर्नससाठी टेक्स्ट कॉपी करा किंवा त्याचा स्क्रिनशॉट घेऊन ठेवा

– बेसिक डिटेल्स भरल्यानंतर पुढच्या पानावर अर्जदाराची माहिती भरावी लागेल

– प्रत्येक अर्जासाठी भारतातील एक रेफरन्स असलेला व्यक्ती आणि अफगाणिस्तानातील एक रेफरन्स असलेल्या व्यक्तींची नाव, फोन नंबर आणि पत्त्याची आवश्यकता राहील

– अर्जदारांना हा व्हिसा मोफत मिळणार आहे. यासाठी कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही

afghanistan crisis : ‘हवाई दलाचे धन्यवाद’, काबुलमधील भारतीय राजदुतांची भावुक प्रतिक्रिया
India Afghanistan: रोजगारासाठी अफगाणिस्तानात गेलेले यूपीचे १७ जण काबूलमध्ये फसले
अफगाणी विद्यार्थ्यांची भारतावरच मदार
भारतात आयआयटी, दिल्ली विद्यापीठ, जेएनयू, मुंबई विद्यापीठ अशा विविध नामांकित शिक्षणसंस्थांमध्ये अफगाणी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील काही विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणामुळे आपल्या मूळ देशीच आहेत. त्यांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. विशेषत: मुलींना अफगाणिस्तानात शिक्षण घेणं अवघड होणार आहे. त्यामुळे इथं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना पुन्हा भारतात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी मागणी दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेणारा खलिल नादारी यानं ‘मटा’शी बोलताना केलीय. याचबरोबर सध्या भारतात असलेल्या विद्यार्थ्यांचा व्हिसा कालावधी संपायला आला आहे. तर काहींची कागदपत्रे दूतावासात अडकली आहेत. यामुळे अशा विद्यार्थ्यांनाही कागदपत्रांसाठी अडवू नये, अशी मागणीही या विद्यार्थ्यांनी भारत सरकारकडे केली आहे.

inside story : तालिबानची दुतावासावर वक्रदृष्टी, भारताने ‘असं’ सुरक्षितपणे बाहेर काढले कर्मचाऱ्यांना
काबूलहून भारतीय हवाईदलाचं C-17 विमान गुजरातमध्ये दाखल, ‘वंदे मातरम’च्या घोषणाअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अफगणसतनत #उलटपलट #भरतचय #ततकळ #ईवहससठ #अस #दखल #कर #अरज

RELATED ARTICLES

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Most Popular

Box Office Report: बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीचा धमाका; ‘बंटी और बबली 2’ ची निराशा

Box Office Report :   चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर सर्व सिनेमा प्रेमींनी थिएटर्सकडे धाव घेतली. अभिनेता अक्षय कुमारचा  (Akshay Kumar)...

जर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल

मुंबई : Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी  (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जिऱ्याच्या पाण्याचे...

लस घेऊनही एवढ्या टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज नाहीत!

ठाण्यातही महापालिकेच्या सेरो सर्वेचा दिलासादायक अहवाल समोर आला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

नवीन कोरोना व्हायरस ‘चिंतेचा’, WHOनं दिलं ‘हे’ नाव, धोका अधिक!

Omicron B.1.1.529 : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे....

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

यशस्वी-अरमानमुळे मुंबईचा पाचवा विजय

यशस्वी जैस्वाल (७६ चेंडूंत ७८ धावा) आणि कर्णधार अरमान जाफर (१०२ चेंडूंत ७९) यांच्यामुळे मुंबईने २५ वर्षांखालील राष्ट्रीयस्तरीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग पाचवा...