Saturday, November 27, 2021
Home भारत अफगाणिस्तानच्या स्पेशल फोर्सचा जवान दिल्लीत विकतोय फ्रेंच फ्राईज; म्हणाला 'तिकडे गेलो तर...'

अफगाणिस्तानच्या स्पेशल फोर्सचा जवान दिल्लीत विकतोय फ्रेंच फ्राईज; म्हणाला ‘तिकडे गेलो तर…’


नवी दिल्ली, 17 ऑगस्ट: तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा (Taliban control Afghanistan) मिळाल्यानंतर तेथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. अफगाणिस्तानात अडकलेले अनेक लोक आपला देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण चहुबाजूंनी मार्ग बंद केल्यानं त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत काही लोक आधीच अफगाणिस्तान सोडून अन्य देशात आले आहेत. उमेद हा असाच एक अफगाण नागरिक आहे, जो पाच महिन्यांपूर्वी भारतात आला होता. या ठिकाणी आल्यानंतर त्यानं आता दिल्लीच्या लाजपत नगरमध्ये फ्रेंच फ्राईज विकण्याचं (Sell French Fries in Delhi) काम सुरू केलं आहे. जर अफगाणिस्तानात परत गेलो तर ते आपल्याला जिवंत ठेवणार नाहीत, अशा भावना त्यानं व्यक्त केल्या आहेत.

उमेद हा अफगाणिस्तानच्या स्पेशल फोर्सचा (Afghan Special Force) सैनिक होता. NBT च्या वृत्तानुसार, तो आता दिल्लीत फ्रेंच फ्राईज विकून दिवसाला जवळपास 300 रुपयांची कमाई (Earn 300 Rs Per Day) करत आहे. शिवाय तो आता हिंदी भाषा शिकण्याचाही प्रयत्न करत आहे. उद्या काय होईल याबाबत आपल्याला काहीच माहीत नाही. तो चांगल्या नोकरीच्या शोधात आहे. पण सुरुवात कुठून आणि कशी करायची याचं उत्तरही त्यांच्याकडे नसल्याचं उमेदनं सांगितलं आहे.
हेही वाचा-तालिबानचं वार्षिक उत्पन्न वाचून व्हाल थक्क, तीन ठिकाणांहून होते मजबूत कमाई
उमेदनं पुढे सांगितलं की, तालिबानसोबतच्या लढ्यात युद्धभूमीवर मरण पावलेल्या मित्रांची आपल्याला खूप आठवण येते. त्यानं पुढं सांगितलं की, आपण दोन वर्षांचा असताना त्याचे आई -वडील एका रस्ते अपघातात मरण पावले आहेत. यानंतर त्यानं 18 व्या वर्षी अफगाणिस्तान सैनिकात दाखल झाला होता. आता तो निर्वासित कार्डाच्या मदतीनं दिल्लीत राहत आहे.
हेही वाचा-अफगाणिस्तानातील सरकारी कर्मचाऱ्यांचं भवितव्य काय? तालिबानची मोठी घोषणा
उमेदनं पुढं सांगितलं की, अफगाण सैन्यात काम करताना आपण अनेक ठिकाणी तैनात होतो. त्यानं लढताना अनेक तालिबान सैनिकांना ठार केलं आहे. यामुळेच तो आता तालिबानच्या हिटलिस्टवर आहे. त्याच्याकडे युद्धभूमीवरील काही व्हिडिओ देखील आहेत. पण अफगाणिस्तानात परत गेलो, तर जीवंत परतणार नाही. तालिबान मला जिवंत सोडणार नाही, असंही त्यानं म्हटलं आहे. यावेळी त्यानं आपल्या शरीरावरील जखमाही दाखवल्या आहेत. तालिबानशी लढताना त्याला कधीही गोळी लागली नाही. पण छर्रे अनेकदा लागले असल्याचं त्यानं सांगितलं आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अफगणसतनचय #सपशल #फरसच #जवन #दललत #वकतय #फरच #फरईज #महणल #तकड #गल #तर

RELATED ARTICLES

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Most Popular

उर्फी जावेदचा फ्रंट ओपन टॉप, ट्रोलर्स म्हणाले, ‘अचानक सोसाट्याचा वारा आला तर….’

उर्फी जावेदचा विचित्र फॅशन सेन्स, आता तर फ्रंट ओपन टॉप घालून....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून घ्या

दिल्ली, 27 नोव्हेंबर: अनेकांना कॉफी (Coffee) प्यायला आवडते. सकाळी झोपेतून उठल्यावर, ऑफिसमध्ये काम करताना किंवा थकल्यावर मेंदू आणि शरीराला पुन्हा तरतरी आणण्यासाठी कॉफी...

Petrol, Diesel Price : दिवाळीपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती जैसे थे

Petrol, Diesel Price Today, Petrol Diesel Rate 27 November : देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती सलग 25व्या दिवशी बदललेल्या नाहीत....

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

कान स्वच्छ करण्यासाठी चुकूनही वापरू नका बड्स; त्याऐवजी या सोप्या ट्रिक्स वापरा

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : अनेकदा लोक कान स्वच्छ करण्यासाठी बड्सचा वापर करतात. परंतु, कानांविषयीच्या तज्ज्ञांच्या मते, असं करणं कानासाठी धोकादायक ठरू शकतं....

Good Health Care Tips: जास्त पाणी प्यायल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. आपल्या...