Saturday, November 27, 2021
Home लाईफस्टाईल अफगाणिस्तानच्या सत्तापालटाची झळ आपल्या स्वयंपाकघरापर्यंत! तालिबानमुळे फोडणीचा तडका झाला महाग

अफगाणिस्तानच्या सत्तापालटाची झळ आपल्या स्वयंपाकघरापर्यंत! तालिबानमुळे फोडणीचा तडका झाला महाग


नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : रोजच्या जेवणातले पदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे हिंग (Asafoetida). भारतीयांच्या स्वयंपाक घरामध्ये (Kitchen) हिंगाची डबी किंवा मसाल्याच्या डब्यात हिंगाचं स्थान अढळ आहे. जेवणाची चव त्याच्या फोडणीमुळे वाढते आणि फोडणीसाठी हिंग लागतंच. हिंग चवीबरोबरच औषधीही (Medicine) आहे. पोटा संदर्भातल्या अनेक आजारांमध्ये (Stomach Related Diseases) हिंगाचा उपयोग केला जातो. मात्र, आपल्या रोजच्या जीवनामध्ये (Everyday Life) वापरलं जाणार हिंग हा मसाल्याचा पदार्थ भारतातला नाही. हिंग मध्य आशियामधून भारतामध्ये (Meade Est to India) आलं आणि नंतर आपल्या जेवणामधला अविभाज्य भाग झालं. मुघल साम्राज्याच्या काळामध्ये भारतामध्ये हिंग आलं असं सांगितलं जातं.
पण, काहींच्यामते आयुर्वेदात हिंगाचा उल्लेख ‘हिंगु’ या नावाने आहे. आयुर्वेदात हिंगाचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. हिंग पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करतं. त्यामुळे पोटात गॅसेस झाला तर हिंग पाण्याबरोबर घेतल्यास सांगितलं जातं. उग्र वासामुळे हिंगला ‘डेव्हिल्स डंक’ असंही म्हणतात. तर, इराणमध्ये लिंगाला ‘फुड ऑफ गॉड’ असंही म्हटलं जातं.
भारताच्या केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये सांबार मध्ये हिंग आवर्जून वापरलं जातं. तर, गुजरात, महाराष्ट्र या भागात देखील फोडणीसाठी हिंगाचा वापर केला जातोच. पण, हिंगाचं उत्पादन खरंतर भारतामध्ये घेतलं जात नाही. भारतामध्ये हिंग इराण, अफगाणिस्तान उज्बेकिस्तान आणि कजाकिस्तान मधून आयात केलं जातं. भारतामध्ये दरवर्षी 1200 टन हिंगाची आयात केली जाते. यासाठी 600 कोटी रुपये मोजावे लागतात. म्हणूनच याची किंमत देखील जास्त असते. यामध्ये अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये अफगाणी किंवा पठाणी हिंगाला जास्त मागणी असते. काबुली सफेद आणि लाल हिंग असे हिंगाचे दोन प्रकार आहेत.
(‘या’ उपायांनी मिनिटात पाली घर सोडून पळून जातील; संपेल कायमचा त्रास)
जगभरात हिंगाच्या 130 प्रजाती आहेत. ‘फेरुला फेटिडा’ या नावाने हिंगाच्या झाडाला ओळखलं जातं. हिंग या झाड्याच्या फुलांपासून, देठापासून, पानांपासून, किंवा फळांपासून मिळत नाही तर, मुळांच्या रसापासून हिंग तयार होतो. आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य आलं आहे. तिथल्या उलथापालथीमुळे हिंग आयात करणं कठीण होऊन बसणार आहे. सध्या भारतामध्ये हिंग लागवडीसाठी पावलं उचलली गेली आहेतय. त्यासाठी कीउन्सिल ऑफ सायंटिफि अ‍ॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्च अँड म्हणजेच CSIR ने उचललेली आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये लाहोल व्हॅलीमध्ये शेतकऱ्यांनी हिंगाच्या शेतीला सुरुवात केली आहे.
(नको सुगामेवा खराब होण्याची चिंता! असा साठवून ठेवला तर नाही लागणार किडे)
यासाठी हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजीने सहकार्य केलं आहे.  CSIR कडून देखील या भागामध्ये हिंगाच्या शेतीला प्रोत्साहन दिले जातं आहे. 15 ऑक्टोबर 2020 लाहोल व्हॅलीमध्ये क्वारिंग गावांमध्ये हिंगाच्या शेतीसाठी बीजरोपण करण्यात आलं आहे. यासाठी फेरूला एस्टोफटिडाच्या झाडांचं बी वापरण्यात आलं आहे. हिंगाच्या एका रोपापासून अर्धा किलो हिंग मिळू शकतो मात्र, हिंगाच्या रोपाची पूर्ण वाढ होऊन त्यापासून हिंग तयार करण्यासाठीरस मिळेपर्यंत 4 ते 5 वर्षे वाट पाहावी लागते. शुद्ध हिंगाची किंमत 45 ते 40 हजार रुपयांवर असते.
(दूध पिताना एक छोटीशी चूक पडेल महागात; तुम्हालाही अशी सवय तर नाही ना?)
म्हणजेच आपल्या देशामध्ये हिंगाची निर्मिती होण्यासाठी आणखी किमान 4 वर्षे वाट पाहावी लागणार आहे. पण, त्यानंतर हा प्रयोग यशस्वी झाला तर शेतकऱ्यांना लाखोंनी फायदा होणार आहे. याशिवाय हिंगसाठी आपल्याला अफगाणिस्थान सारख्या देशावर अवलंबून राहावं लागणार नाही. पुढच्या काळामध्ये हिमालयाच्या कुशीमध्ये लडाख हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश या भागात देखील हिंगाची शेती होऊ शकते.
(शी…! व्हॅनिला फ्लेव्हरची निर्मिती ‘यापासून’ होते? समजलं तर वापरच बंद कराल!)
कारण या भागातलं वातावरणं हिंगाच्या शेतीसाठी पूरक म्हणजे शुष्क थंड आणि कोरडं आहे.  मात्र पुढचे 4 ते 5 वर्षे लिंगाच्या निर्मिती साठी वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात सत्तापालटानंतर भारतीयांच्या ताटातलं हिंग महाग होणार हे निश्चित मानलं जात आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#अफगणसतनचय #सततपलटच #झळ #आपलय #सवयपकघरपरयत #तलबनमळ #फडणच #तडक #झल #महग

RELATED ARTICLES

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

अमिताभ बच्चन ‘वाईट व्यक्ती’ करीनाचा समज, बिग बींनी पाय धुतल्यानंतर बदललं मत

असं काय झालं की चक्क बिग बींना करीनाचे पाय धुवावे लागले, त्यानंतर करीनाचं बदललं मत    अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

Most Popular

Corona च्या नव्या स्ट्रेनला WHO नं दिलं नाव, म्हणाले…

जिनेव्हा, 27 नोव्हेंबर: कोरोना व्हायरस (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटनं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. जागतिक...

संप अखेर मिटला? कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्याचे ST कृती समितीचं आवाहन

मुंबई, 26 नोव्हेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठाम राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा (st bus strike) संप अखेर मिटल्यात जमा झाला आहे....

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

Airtel चा बंपर धमाका, या ४ प्लान्स सोबत रोज मिळणार फ्री डेटा, जाणून घ्या सर्वकाही

हायलाइट्स:एअरटेल यूजर्संसाठी एक गुड न्यूज चार प्लानमध्ये मिळणार ५०० एमबी डेटा फ्री प्लानची किंमत आणि बेनिफिट्स पाहा नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या नेहमी यूजर्संना...

… तर टीम इंडिया DRS साठी नकार देईल! न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं लगावला टोला

कानपूर, 27 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. टीम साऊदीनं (Tim Southee) 5...

तुम्हाला हिवाळ्यात आल्याचा चहा प्यायला आवडतो का? मग या गोष्टीही माहीत असाव्यात

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : हिवाळ्यात (Winter) चहा पिणं कोणाला आवडत नाही? बाहेरची थंड हवा आणि हातात गरम चहाचा कप प्रत्येक माणसाचा मूड बदलतो....