Saturday, August 13, 2022
Home विश्व अफगाणिस्तानचे राष्ट्रपती म्हणतात, तालिबानच्या हिंसाचारासाठी अमेरिका जबाबदार!

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती म्हणतात, तालिबानच्या हिंसाचारासाठी अमेरिका जबाबदार!


काबूल: अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून तीव्र हल्ले सुरू झाले आहेत. तालिबानने अफगाणिस्तानमधील बहुतांशी भागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. तर, दुसरीकडे तालिबानच्या क्रूरतेच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. तालिबानच्या हिंसाचारासाठी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी अमेरिकेवर टीका केली आहे. तालिबानच्या हिंसाचारासाठी अमेरिकेने जलदपणे सैन्य माघारी घेतल्याचा हा परिणाम असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तालिबानच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी आणि प्रमुख शहराच्या सुरक्षितेवर अफगाण सैन्य लक्ष केंद्रीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी तालिबानविरोधात एकजुटीने सामना करण्याचे आवाहन खासदारांना केले. अमेरिका आणि नाटो सैन्याच्या माघारीनंतर अशरफ गनी यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

तालिबानची क्रूरता; वडील सैन्यात म्हणून लहान मुलाला १०० फटक्यांची शिक्षा
गनी यांनी खासदारांना संबोधित करताना म्हटले की, तालिबानसोबत शांतता चर्चा करून काही ठोस फायदा झाला नाही. या उलट चर्चेमुळे अफगाणिस्तानच्या लोकांमध्ये संशय आणि शंका निर्माण झाली. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी पुढे म्हटले की, तालिबानचा शांततेवर विश्वास नाही. पुढील सहा महिन्यात अभूतपूर्व बदल होतील आणि तालिबानचा पाडाव होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाकडे दहशतवाद्यांचा पाडाव करण्याची क्षमता असल्याचेही त्यांनी सांगितले.

काबूल: तालिबानने केली विनोदी अभिनेत्याची हत्या; व्हिडिओ व्हायरल
खळबळजनक दावा! ‘या’ कारणांमुळे तालिबानकडून भारतीय पत्रकाराची हत्या
दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये सुरक्षा दल आणि तालिबानमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. राष्ट्रपतींच्या भाषणानंतर काही तासांमध्येच तालिबानने हेलमंद प्रांताची राजधानी लष्कर गाहमधील प्रांतीय सरकारच्या रेडिओ आणि टीव्ही भवनावर ताबा मिळवला.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अफगणसतनच #रषटरपत #महणतत #तलबनचय #हसचरसठ #अमरक #जबबदर

RELATED ARTICLES

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Most Popular

Todays Headline 13th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

सोनं खरेदी करण्यासाठी शुभ दिवस कोणता? हा दिवस तर टाळाच

<!-- --><!-- -->Auspicious day for gold shopping, which is the auspicious day to buy gold and which day to Avoid mhpj...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Hing Water Benefits : हिंगाचं पाणी पोटाच्या आजारांवर रामबाण उपाय, आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर

Health Tips : पोटाचं आरोग्य जपायचं असेल तर हिंगाचे फायदे नक्की जाणून घ्या. हिंग पोटासाठी अतिशय फायदेशीर आहे....

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेटली भेट अन्..

बरकत अली असे मृताचे नाव असून तो गंगापूर शहरातील मदिना मशिदीचा रहिवासी आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...