Saturday, July 2, 2022
Home भारत अपात्र आणि राजीनामा दिलेल्या सदस्यांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी आणा

अपात्र आणि राजीनामा दिलेल्या सदस्यांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी आणा


Maharashtra Political Crisis : सभागृहातून निलंबित केलेल्या किंवा अपात्र ठरलेल्या सदस्यांना पुढील निवडणूक लढवण्यासाठी बंदी घालावी, अशा आशयाची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर ही  याचिका  दाखल करण्यात आली आहे. या संबंधीत आधीच्या सर्व प्रलंबित प्रकरणांवर ताताडीने सुनावणी करण्याची मागणीही  करण्यात आली आहे. जेणेकरुन विधानसभेतून अपात्र ठरलेल्या किंवा राजीनामा दिलेल्या आमदारांना पुढच्या पाच वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यापासून रोखता येईल.

मध्य प्रदेशातील काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी ही याचिका केली आहे. 2021 साली दाखल करण्यात आलेल्या प्रलंबित याचिकेवर दाखल करण्यात आली होती.  ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2021 मध्ये केंद्र सरकारचे मत मागितले आहे. 

काय म्हटले आहे या याचिकेमध्ये? 

 राजकीय पक्षांनी अलीकडच्या काळात  देशभरात एक ट्रेंड विकसीत  विकसित केला आहे. राज्यघटनेच्या अनुसुचीमध्ये नमूद असलेल्या गोष्टींपासून पळवाट शोधून  सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना सभागृहातून राजीनामा देण्यास भाग पाडलं जाते आणि विरोधी पक्षांचे सरकार पाडले जाते. राजीनामा देणाऱ्या आमदारांना नवीन सरकारकडून मंत्रीपदे दिली जातात आणि पोटनिवडणुकीसाठी पुन्हा लढण्यासाठी तिकीटही दिले जाते. 

सरन्यायाधीश एसए बोबडे आणि न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि व्ही रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने या प्रकरणी नोटीस बजावली होती. या संबंधी कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नाही किंवा या अगोदर तशा संबंधीचा दिशादर्शक कायदा करण्यात आला नसल्याने त्याचा राजकीय पक्षांकडून गैरफायदा घेतला जातो आणि वेगवेगळ्या राज्यातील जनतेने निवडून दिलेले सरकार पाडले जाते. 

महाराष्ट्रातही अशाच प्रकारची घटना घडण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांकडून आपल्या देशातील लोकशाहीला धोका पोहचवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या गोष्टी रोखण्यासाठी  न्यायालयाने लवकरात लवकर पाऊले उचलायला हवीत.  राज्यघटनेतील दहाव्या अनुसुचीप्रमाणे, सभागृहातील एखाद्या सदस्याला निलंबित केले गेले तर त्याला पुढील कालावधीसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालावी. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अपतर #आण #रजनम #दललय #सदसयन #पच #वरषसठ #नवडणक #लढवणयस #बद #आण

RELATED ARTICLES

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

‘उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ’, केसरकरांचे चिमटे

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : शिवसेनेच्या शिंदे गटाने नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाचा नेता आज...

Most Popular

shweta tiwari in yellow top : ४० वर्षांच्या श्वेता तिवारीचा हॉट लूक, फोटो पाहून चुकला चाहत्यांच्या हृदयाचा ठोका

टिव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या मोहक अदांनी सर्वांचेच लक्ष वेधून येते. श्वेता तिवारीचे फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येणार नाही.नुकतेच तिने तिच्या...

19 वर्षांपर्यंत मुलीला 5 वेळा विकलं, महाराष्ट्रासह येथील मुलींवर लागते बोली

सात वय वर्षाची एक मुलगी जिच्या वयाच्या मुली, खेळायच्या, मज्जा-मस्ती करायच्या, आपलं लहानपण भरभरुन जगायच्या. मात्र, आपलं आनंदी आयुष्य जगत असताना, ती दिल्लीला...

देशमुख कुटुंबावर नवं संकट; यशवर लागणार खुनाचा आरोप?

मुंबई, 30 जून:  स्टार प्रवाह ( Star Pravah) वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेनं नव वळणं घेतलं आहे. पिकनीकला...

करण जोहरला मोठा धक्का,’या’ दोन स्टार्सनी नाकारली Koffee With Karanची ऑफर!

करण जोहरच्या कॉफ़ी विथ करणच्या 7 व्या सीझनला येत्या 7 जूलैपासून सुरुवात होणार आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Diamond League 2022 : नीरज चोप्राने मोडला स्वत:चाच विक्रम; रौप्य पदकावर कोरले नाव

टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा प्रदीर्घकाळाच्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरला आहे. त्यानंतर त्याने धडाकेबाज कामगिरी सुरू केली आहे. त्याने स्टॉकहोम येथील...

आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प – दीपक केसरकर

पणजी, गोवा : CM Eknath Shinde News : महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केला आहेत. ही एक चिंतेची बाब आहे. त्यामुळे कृषी दिनी मुख्यमंत्री...