Saturday, May 21, 2022
Home मुख्य बातम्या अन् त्यांनी मरणाचा उत्सव केला; नाशिकमधील परिवाराचा दशक्रिया विधीला फाटा देत रक्तदान,...

अन् त्यांनी मरणाचा उत्सव केला; नाशिकमधील परिवाराचा दशक्रिया विधीला फाटा देत रक्तदान, लसीकरण
नाशिक  : दशक्रिया विधीला होणारी भाषणे आणि इतर कार्यक्रमांना फाटा देत मातोरी येथील पिंगळे परिवाराने आदर्श उभा केला आहे. दशक्रिया विधीला फाटा देत रक्तदान आणि कोविद लसीकरण करण्यात आल्याचा स्त्युत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांचा मातोश्री सावित्रीबाई पोपटराव पिंगळे यांचे 5 मे रोजी 89व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले होते, त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन बहिणी व जावई असा परिवार आहे. या सगळ्यांनी एकमताने निर्णय घेत दशक्रिया विधी निमित्त पारंपरिक कार्यक्रमांना फाटा देत दहाव्याच्या दिवशी 100 रक्त पिशव्या संकलन करण्याचा संकल्प करत रक्तदान शिबिर आणि कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम आयोजित करण्याचे पिंगळे कुटुंबीयांनी ठरवले. यासाठी मातोरी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातच दहाव्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,

या कार्यक्रमात संदर्भ सेवा रुग्णालयाची शासकीय रक्तपेढी व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने रक्तदान शिबिर व कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली दरम्यान कार्यक्रमासाठी आलेले ग्रामस्थ, पिंगळे कुटुंबीयांचे आप्तेष्ट , मित्र आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी,ग्रामसेवक,आरोग्य कर्मचारी व अधिकारी तसेच WMO चे सदस्य यांनी रक्तदान केले, त्याचबरोबर अनेक ग्रामस्थांनी कोविड 19 प्रतिबंधात्मक लस घेतली, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी या कार्यक्रमाप्रसंगी भेट देत दुःखद प्रसंगावेळी समाजभान दाखवत रक्तदान आणि कोविड लसीकरण आयोजित केल्याबद्दल पिंगळे कुटुंबीयांचे कौतुक केले,

रक्तदान करत आईला मुलाची श्रद्धांजली
दशक्रिया विधी निमित्त रक्तदानाचे आवाहन करत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी स्वतः तसेच पत्नी जयश्री यांनी रक्तदान करत आईला श्रद्धांजली वाहिली. दशक्रिया विधी निमित्त पारंपरिक पद्धतीना फाटा देत रक्तदान शिबिर व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम हा अनोखा उपक्रम राबवल्यामुळे पिंगळे कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पिंगळे कुटुंबीयांसमवेत मातोरीचे सरपंच दीपक हगवणे, उपसरपंच मनीषा रोकडे,सर्व सदस्य, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, वर्षा फडोळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर, गट विकास अधिकारी डॉ सारिका बारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शैलेश निकम, वैद्यकीय अधिकारी डॉ अमित पाटील, डॉ पुरी यांनी मेहनत घेतली.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अन #तयन #मरणच #उतसव #कल #नशकमधल #परवरच #दशकरय #वधल #फट #दत #रकतदन #लसकरण

RELATED ARTICLES

Pune NCP Protest: लाल महालात लावणीप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन ABP Majha

पुण्यातील लाल महालात लावणीचं शुटिंग झाल्याचं समोर आल्यानंतर मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या लावणी शुटिंगचा संभाजी ब्रिगेडने निषेध...

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : Sim Card: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेत...

Most Popular

Recharge Plan: युजर्सची मजा ! या प्लानमध्ये ३ महिने Disney+ Hotstar फ्री, सोबत ८ GB डेटा सुद्धा, किंमत खूपच कमी

नवी दिल्ली: VI Data Plans: OTT प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar ची संख्या चांगलीच मोठी आहे. हेच Disney+ Hotstar आता फक्त १५१ रुपयांमध्ये उपलब्ध आहे....

Covid19 effect : कोरोनाचं रौद्ररूप, आता कोरोनातून ब-या झालेल्या लोकांना सतावतंय ‘हे’ 1 भयंकर लक्षण..!

करोना व्हायरसचा (Coronavirus pandemic) धोका सध्या तरी कमी होताना दिसत नाहीये. अनेक देश कोरोनाच्या चौथ्या लाटेचा (Covid 4th wave) सामना करत आहेत. अर्थात,...

Vastu Tips घरामध्ये ‘अशा’ प्रकारे वापरा कापूर! सकारात्मकता येईल आणि धनातही वाढ होईल, जाणून घ्या

Vastu Tips : तुमच्या घरात जर आनंदाचे वातावरण असावे असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरातील...

दैनंदिन राशिभविष्य : आर्थिक लाभ होणार पण ‘या’ राशीने मात्र खर्च टाळावा

आज दिनांक 21 मे 2022 वार शनिवार. आज वैशाख कृष्ण षष्ठी. चंद्र आज मकर राशीत भ्रमण करेल. तिथून तो राहुशी केंद्र योग करेल. पाहूया आजचे...

Cannes महोत्सवाला गालबोट; विवस्त्र महिलेच्या आक्रोशानं रेड कार्पेट हादरलं

मुंबई : (Cannes) साऱ्या कलाजगताची नजर लागून राहिलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतासोबतच जगभरातील बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. जिथं एकिकडे सर्व सेलिब्रिटी फॅशनचे नवनवीन...