Saturday, November 27, 2021
Home भारत ..अन् चमत्कार झाला! मृत्यूनंतर 19 तासांनी पुन्हा श्वास घेऊ लागला मुलगा, पण...

..अन् चमत्कार झाला! मृत्यूनंतर 19 तासांनी पुन्हा श्वास घेऊ लागला मुलगा, पण…


लखनऊ 18 ऑगस्ट : तीन दिवस उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी सोमवारी दुपारी 3 वाजता एका अल्पवयीन मुलाला मृत घोषित केलं. मंगळवारी सकाळी 10 वाजता त्याचे कुटुंबीय मृतदेह घेऊन आपल्या घरी पोहोचले. मात्र, मृत्यूनंतर 19 तासांनी त्याच्या शरीरामध्ये काही हालचाली जाणवू लागल्या (Boy Who Was Declared Dead Started Breathing After 19 Hours). यानंतर तात्काळ त्याला एका खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करण्यात आलं. याठिकाणी त्याच्यावर 4 तास उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यानच या मुलाचा मृत्यू झाला. संपूर्ण दिवसभराचा हा घटनाक्रम पूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) प्रयागराज येथील आहे.

भर रस्त्यावर तरुणाची हत्या केली अन् चेहऱ्यावर केली लघुशंका, औरंगाबादमधील घटना
मानधाताच्या डिहवा गावातील 17 वर्षीय कमलेश मौर्य तब्येत खराब होती. याच कारणामुळे तीन दिवसाआधी कुटुंबीय त्याला प्रयागराज येथे घेऊन गेले आणि त्याला एक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोमवारी दुपारी डॉक्टरांनी कमलेशला मृत घोषित केलं. रुग्णालयाचं बिल भरायला उशीर झाल्यामुळे रात्री हे सर्व तिथेच थांबले. मंगळवारी सकाळी 10 वाजता कुटुंबीय त्याचा मृतदेह घेऊन घरी पोहोचले तेव्हा त्याला मिठी मारू लागले.

कोरोनाला घाबरून जोडप्यानं संपवलं जीवन; मृत्यूआधी पोलिसांना पाठवला भावनिक मेसेज
याच दरम्यान अचानक कमलेशच्या शरीरात काही हालचाली जाणवू लागल्या. हे पाहून कुटुंबीयदेखील हैराण झाले. तात्काळ त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. त्याची नाडी तपासल्यानंतर डॉक्टरांनी त्याला ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. यानंतर कुटुंबीया तात्काळ कमलेशला एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले. तिथे भर्ती केल्यानंतर त्याला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं. चार तास कमलेश श्वास घेत होता मात्र दुपारी दोनच्या सुमारास त्याचा श्वास थांबला. यानंतर कुटुंबीय त्याचा मृतदेह घेऊन घरी परतले.

Published by:Kiran Pharate

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अन #चमतकर #झल #मतयनतर #तसन #पनह #शवस #घऊ #लगल #मलग #पण

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

Most Popular

लस घेऊनही एवढ्या टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज नाहीत!

ठाण्यातही महापालिकेच्या सेरो सर्वेचा दिलासादायक अहवाल समोर आला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

तुम्हाला हिवाळ्यात आल्याचा चहा प्यायला आवडतो का? मग या गोष्टीही माहीत असाव्यात

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : हिवाळ्यात (Winter) चहा पिणं कोणाला आवडत नाही? बाहेरची थंड हवा आणि हातात गरम चहाचा कप प्रत्येक माणसाचा मूड बदलतो....

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

<p>वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल...

महागाईचा भडका : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

Inflation :दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे.   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...