Saturday, August 20, 2022
Home करमणूक अन्विताला आवडत नाही 15 जून ही तारीख; काय नेमकं कारण?

अन्विताला आवडत नाही 15 जून ही तारीख; काय नेमकं कारण?


मुंबई 1 जुलै: मराठीमधील एक गोड आणि हसतमुख अभिनेत्री म्हणून (Anvita Phaltankar) अन्विता फलटणकर कडे पाहिलं जातं. अन्वितचा आज वाढदिवस आहे. सगळ्यांची लाडकी स्वीटू पंचविसाव्या वर्षात पदार्पण करणार आहे. अन्विता कायमच दिलखुलास म्हणूनच ओळखली जाते. पण सगळ्यांच्या लाडक्या स्वीटूला मात्र एक गोस्ट अजिबात आवडत नाही. काय आहे ती गोष्ट?

अन्विता कायम बिनधास्त आणि कूल अंदाजात असते. आजच्या काळातली ही यंग आणि स्वीट अभिनेत्री कधीच मरगळलेली दिसत नाही. मुंबईत लहानाची मोठी झालेली अन्विता मुंबईशी एक घट्ट बॉण्ड शेअर करते असं असूनही मुंबईच्या धो धो पडणाऱ्या पावसाबद्दल तिला विशेष आकर्षण नाहीये असं तिने एका मुलाखतीत सांगितलं.

राजश्री मराठीच्या एका मुलाखतीत ती म्हणते, “मला बदाबदा पाऊस पडत असताना बाहेर पडायला, कामावर जायला अजिबात आवडत नाही. पावसात बाहेर पडणं हे मला पटत नाही. विशेषतः 15 जून हा दिवस मला कधीच आवडला नाही. कारण त्या दिवशी भर पावसात शाळेत जावं लागायचं. आणि ते ओसंडून वाहणारे रस्ते, चिखलाने भरलेले खड्डे मला अजिबात आवडत नसत. त्या चिखलात हमखास पाय पडून बूट खराब होणं हे तर वाईट स्वप्नाहून सुद्धा वाईट. शाळेत हमखास कोणीतरी भिजून यायचं, सगळं ओलं ओलं असतं त्याचा वर्गात वास पसरायचा अशी माझी पावसाची आठवण आहे. मला घरात बसून पाऊस बघायला आवडतो. पावसात चहा आणि मॅगी असा माझा प्लॅन असतो. मी माझ्या एका प्रदेशात राहणाऱ्या मित्रासोबत हा प्लॅन कायम अमलात आणते.”

अन्विताचा अंदाज कायमच जगावेगळा राहिला आहे. येऊ कशी तशी मी नांदायला (Who is Sweetu in Yeu Kashi Tashi Mi Nandayala) मधील स्वीटू या पात्राने तिला घराघरात ओळख दिली. पण स्वीटू जितकी शांत गुणी आहे तितकीच अन्विता गुणी असली तरी प्रचंड मस्तीखोर सुद्धा आहे.

हे ही वाचा- Ketaki Chitale EXCLUSIVE: जेलमध्ये नेताना केतकी बरोबर घडलं असं काही भयानक, ऐका तिच्याच तोंडून

 अन्विता आणि मालिकेतील ओम पात्र साकारणारा शाल्व मिळून सेटवर बराच दंगा करायचे, मजा करायचे हे अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा दिसून आलं आहे. आज एवढे दिवस झाले तरी या मालिकेला कोणी विसरू शकलं नाहीये. या मालिकेच्या आणि स्वीटू ओम च्या तमाम फॅनपेजने त्यांना वारंवार ही मालिका पुन्हा सुरु करा अशी विनवणी सुद्धा केली आहे.

अन्विताने गर्ल्स नावाच्या चित्रपटात काम केलं आहे. अन्विता येत्या काळात कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसेल याबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#अनवतल #आवडत #नह #जन #ह #तरख #कय #नमक #करण

RELATED ARTICLES

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज नऊ वर्ष, प्रकरणात आतापर्यंत काय झालं? वाचा सविस्तर…

Dr. Narendra Dabholkar Murder Case : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या...

Most Popular

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज नऊ वर्ष, प्रकरणात आतापर्यंत काय झालं? वाचा सविस्तर…

Dr. Narendra Dabholkar Murder Case : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या...

आता UKमध्येही सुरू होणार UPI सेवा! हजारो भारतीय विद्यार्थांना होणार फायदा

मुंबई, 19 ऑगस्ट: यूपीआयच्या माध्यमातून भारतात डिजिटल इंडिया अभियानाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये यूपीआय आयडी किंवा कोड स्कॅन करण्याच्या...

पत्नी म्हणाली, मी थकलीये तुम्ही भाजी घेऊन या, ऐकल्यावरच पती संतापला अन् भर…

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : अनेकदा पती-पत्नीमध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरुन वाद होत असतात. मात्र, काही वेळा हे वाद टोकालाही जातात. तसेच यातून अनेकदा...

रोनाल्डो डॉर्टमंडकडे?

वृत्तसंस्था, लंडन : नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो जर्मनीतील बोरुसिया डॉर्टमंड क्लबशी करारबद्ध होणार असल्याची शुक्रवारी फुटबॉलजगतात जोरदार चर्चा झाली. अर्थात, या संदर्भात अजून...

क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची वेळ का आली?

प्रशांत केणी नामांकित क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या साथीने शालेय जीवनात क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ करणाऱ्या विनोद कांबळीची कारकीर्द २०००मध्ये संपुष्टात आली. बेशिस्त, वाद अशा अनेक प्रसंगांमुळे...