Sunday, January 16, 2022
Home मुख्य बातम्या "अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार"

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”


Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी म्हटलं आहे.

मुंबई, 27 नोव्हेंबर : राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एक ट्विट करत आपल्या घरावर कुणीतरी पाळत ठेवत असल्याचा दावा केला. त्यानंतर आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याला सुद्धा अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या प्रमाणे अडकवण्याचं कटकारस्थान सुरू असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. नवाब मलिक म्हणाले, ज्या प्रमाणे मी दोन महिन्यांपासून चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली त्यानंतर मला माहिती मिळण्यास सुरुवात झाली की, तुमचे कार्यालय, घर, नातवंड कुठे शिक्षण घेतात याची माहिती घेत आहेत. जेव्हा मी परदेशच्या दौऱ्यावर होतो तेव्हा काहींनी दोघांना पकडले, जे नागरिक फोटोज क्लिक करत होते. जेव्हा या दोघांना पकडलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही घाबरलो होतो म्हणून पळालो.

अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचा प्रयत्न

नवाब मलिक पुढे म्हणाले, कारमध्ये बसलेला व्यक्ती, गाडीचा नंबर सुद्धा समोर आला आहे. आम्ही या संदर्भातील तक्रार मुंबई पोलिसांत करणार आहोत आणि चौकशी करण्याची मागणी करणार आहे. या षडयंत्रामागे कोण आहे याची माहिती समोर यायला हवी. अनेक षडयंत्र माझ्याविरोधात झाले आहेत. या संदर्भातील अनेक पुरावे माझ्याकडे आहेत आणि त्याबाबतही मी पोलिसांना माहिती देईल.

मला वाटतं की, अनिल देशमुख यांना ज्या प्रमाणे अडकवलं जात आहे त्याचप्रमाणे आता काही जण माझ्याविरोधात षडयंत्र करत आहेत. या संदर्भातील मला माहिती मिळाली असून पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत. माझ्याविरोधात खोटी तक्रार केली जात आहे. या संदर्भातील माहितीही मुंबई पोलिसांना देणार आहोत असंही नवाब मलिक म्हणाले.

माझ्याविरोधात षडयंत्र

मी घाबरतो किंवा मला सुरक्षा हवी आहे असं नाहीये. मी कुणालाही घाबरणार नाहीये. कुणालाही रेकॉर्डसाठी फोटो हवे असतील तर ते गुगलवर उपलब्ध आहेत. पण रेकी केली जात आहे. अनिल देशमुखांच्या विरोधात ज्याप्रमाणे खोटी तक्रार करुन त्यांच्या विरोधात कारवाई सुरू झाली. त्याचप्रमाणे केंद्रीय यंत्रणेचे अधिकारी माझ्याविरोधात मसूदा तयार करुन नागरिकांना पाठवत आहेत. तसेच माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला सांगत आहेत असाही खळबळजनक आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

अमित शहांकडे तक्रार करणार

राज्यात एखाद्या मंत्र्याला अडकवण्याचा डाव जर केंद्रीय यंत्रणा करत असेल तर आम्ही सहन करणार नाही. माझ्याकडे खरे पुरावे आहेत. केंद्रीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअप चॅट मला मिळाले असून त्या संदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रार करणार आहे. मी अमित शहा यांच्याकडेही तक्रार करणार आहे.

Published by:Sunil Desale

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अनल #दशमखपरमण #मलह #अडकवणयच #कटकरसथन #अमत #शहकड #तकरर #करणर

RELATED ARTICLES

लस नव्हे तर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर

मुंबई, 16 जानेवारी: कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घाटकोपरमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. संबंधित घटनेबाबतची बातमी...

Fact check- लस घेतल्यानंतर 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू?, BMC ने फेटाळला दावा

मुंबई : गेल्या 2 वर्षांपासून आपण कोरोनाच्या महामारीशी लढा देतोय. सध्या कोरोना विरूद्धच्या लढ्यात लस हे सर्वात प्रभावी शस्त्र मानलं जातंय. मात्र मुंबईत...

जगभरात लोकांनी 365 दिवसात मोबाईलवर घालवले 43 कोटी वर्ष; भारतीय देखील मागे नाहीत

मुंबई, 16 जानेवारी : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कोरोना काळात जणू आपलं सगळं जगच मोबाईलवर एकवटलं आहे. जगभरात लोक...

Most Popular

मुंबईत अपघाताचा थरार, वाळूचा ट्रक रिक्षावर पलटला; रेस्क्यूनंतर चालकाची सुटका

मुंबई, 16 जानेवारी: मुंबईमधील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर रात्री उशीरा भीषण अपघात झाला. वाळूनी भरलेला ट्रक एका रिक्षावर पलटी झाला. अपघातामध्ये रिक्षासह ड्रायव्हर...

‘टीमसाठी बेईमान होऊ शकत नाही’, कॅप्टन्सी सोडल्यावर काय म्हणाला विराट

मुंबई, 15 जानेवारी : विराट कोहलीने टी-20 पाठोपाठ आता टेस्ट टीमची कॅप्टन्सीचाही राजीनामा (Virat Kohli Steps Down) दिला आहे. बीसीसीआयने विराटची वनडे टीमची...

ब्रिटनमध्ये फेब्रुवारीपासून लसीकरण झालेल्या प्रवाशांसाठी चाचणी आवश्यक नाही

Britain Covid19 Update : जगात कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान...

‘तें – एक श्राव्य अनुभव’

‘तेंडुलकरांचे साहित्य कोणत्याही माध्यमात सहजपणे रूपांतरीत करता येते. मानसशास्त्र समजून घ्यायचे असेल तर तेंडुलकराच्या पात्राचा अभ्यास करण्यासारखा आहे. कारण त्यांच्या साहित्यातून ‘माणूस’ समजतो....

फेल होणार नाही Online Transaction, Google Pay पेमेंटवेळी या गोष्टी लक्षात ठेवाच

नवी दिल्ली, 16 जानेवारी : सध्या ऑनलाइन पेमेंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. Google Pay वरुन पेमेंट करताना अनेकदा आपल्या अकाउंटमधून पैसे कट...

ईशा गुप्ताने ब्रालेस फोटोशुटनंतर बेडरूमधील टॉपलेस फोटो केला शेअर

मुंबई, 15 जानेवारी - बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताला (Esha Gupta) काही दिवासापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. मात्र याहीपेक्षा ती सध्या तिच्या बोल्ड फोटोशुटमुळे...