लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीर
सकाळी रिकाम्या पोटी सुके अंजीर खाल्ले, तर ते फायदेशीर ठरतं. त्यात ए आणि बी व्हिटॅमिन, प्रथिनं, फायबर्स, तसंच भरपूर अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) असतात. वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. डाएट, योग, व्यायाम यांच्या जोडीला सुके अंजीर आहारात नियमितपणे ठेवले, तर लठ्ठपणा नक्कीच कमी होऊ शकतो.
पोट साफ होण्यावर रामबाण उपाय
जीवनशैली बदलाचा एक ठळकपणे जाणवणारा परिणाम म्हणजे पोट साफ न होण्याच्या वाढत्या तक्रारी. त्याचंच रूपांतर पुढे मूळव्याध (Constipation), फिशर, फिस्तुला अशा अवघड जागेच्या दुखण्यांमध्ये होतं. सुकं अंजीर हा त्यावरचा एक रामबाण उपाय ठरू शकेल. त्यातल्या फायबर्समुळे (Fibers) पोट साफ होण्यास मदत होते व अॅसिडिटीची समस्याही कमी होते. भरपूर फायबर्स असलेल्या फळांचं सेवन पोट साफ न होण्याच्या तक्रारीवर गुणकारी ठरतं.
रिकाम्या पोटी करा सेवन
सुक्या अंजिराचं सेवन रिकाम्यापोटी केल्यामुळे त्यातले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वं शरीरात व्यवस्थित शोषली जातात. त्यामुळे शरीराला त्याचा अधिक फायदा मिळतो. अंजिरातले अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशिअममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. हृदयाचं कार्य सुरळीत राखण्यासाठीही अंजीर फायदेशीर असतात. हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असणारं कॅल्शिअम (Calcium) सुक्या अंजिरांत असतं. त्यामुळे सुके अंजीर खाल्ल्यानं हाडं मजबूत बनतात.
हे वाचा- OMG! व्यक्तीने एकट्याने फस्त केले तब्बल 32 हजार Burger, शेवटी झाला असा परिणाम की… पाहा VIDEO
पोषणमूल्यांनी युक्त असलेला सुका मेवा आहारात असावा, असं डॉक्टर सांगतात. काजू, बदाम, बेदाणे, काळ्या मनुका आपण नेहमी खातो. त्यासोबत सुके अंजीरही आवर्जून खायला हवेत. सुके अंजीर वर सांगितल्याप्रमाणे सकाळी रिकाम्यापोटी खाता येतात. एरव्हीही खाऊ शकता. कोणाला नुसते सुके अंजीर खायला आवडत नसतील, तर सुक्या अंजिरापासून खीर, बर्फी असे काही पदार्थ तयार करता येऊ शकतात. मुलांना आवडतील असे मिल्कशेक, हलवा, अंजीर स्प्रेड आदी पदार्थही तयार करता येऊ शकतात. जीवनशैलीतले बदल काही वेळा अनिवार्य असतात; मात्र अशा वेळी आहार-विहारात ठरवून केलेले योग्य बदल शरीराचं नुकसान होऊ देणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#अनश #पट #ह #खललत #तर #दररज #पट #हईल #सफ #कधच #हणर #नह #बदधकषठतच #तरस