Saturday, August 13, 2022
Home करमणूक अधिकाराचा योग्य वापर; मराठी मालिकेत घटस्फोटाचे वारे

अधिकाराचा योग्य वापर; मराठी मालिकेत घटस्फोटाचे वारे


गौरी आंबेडकर, एसएनडीटी विद्यापीठ

‘काही दिवसांनी मी या घरात नसेन. मी सोडून चालले हे सगळं. नीट राहा, काळजी घ्या स्वतःची, आपल्या घराची आणि घरातल्या मंडळींची’ हे संवाद लग्नानंतर सासरी निघालेल्या मुलीचे नाहीत. तर ही वाक्य आहेत खंबीरपणे घटस्फोटाचा निर्णय घेतलेल्या एका स्त्रीची. नायक-नायिकेतील प्रेम, प्रेमाला घरच्यांचा विरोध, साग्रसंगीत लग्न, लग्नानंतरचे नवलाईचे दिवस, परस्परांबाबत मनात डोकावणारा संशय हे साधारण टप्पे पार करत अनेक मालिका आता पुढील वळणावर गेल्या आहेत. हे वळण आहे घटस्फोटाचं!

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत या आठवड्यात अरुंधती आणि अनिरुद्धचा घटस्फोट होणार आहे. आपल्या मुलांना, सासू-सासऱ्यांना आता सोडून जायचं ही भावना तिच्या मनाला अस्वस्थ करतेय. पण तरीही आपण मनानं कायम एकच असणार आहोत, एकत्र बांधलेले असणार आहोत, हा विश्वास ती कुटुंबियांना देते. मालिकेतील नायिका अधिक कणखर होत आहे. कायद्याचा आधार घेऊन ती अन्यायाला सडेतोड उत्तर देत आहे. तिच्या या धाडसी पावलांचं कौतुक होताना दिसतंय. काही दिवासांपूर्वी ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेत शुभ्रा आणि सोहमचा घटस्फोट झाला. नैतिकतेच्या मर्यादा ओलांडलेल्या सोहमला शुभ्रानं दिलेल्या या प्रत्युत्तराची बरीच चर्चा झाली. सुरुवातीपासून सोज्वळ, सहनशील, सोशिक असलेल्या शुभ्राचा कधीतरी बांध फुटेल आणि ती योग्य मार्गानं आवाज उठवेल याची प्रेक्षकांना खात्री होती.

‘बायको अशी हव्वी’ या मालिकेत जमीन बळकावण्यासाठी विभासनं जान्हवीशी प्रेमाचं नाटक करून लग्न केलं होतं. पण हा स्वार्थी हेतू साध्य होणार नाही, हे समजल्यावर त्यांच्यात चांगलेच खटके उडू लागले आहेत. त्यामुळे विभासनं जान्हवीकडे घटस्फोटाची मागणी केली आहे. दीपा आणि कार्तिक या ‘रंग माझा वेगळा’ मधील जोडीचीही घटस्फोटाकडे वाटचाल होताना दिसतेय. कोर्टाच्या सांगण्यावरून दीपा कार्तिकच्या घरी राहत असली तरी ते घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं दाखवलंय. ‘सुंदरा मनामध्ये भरली’मध्येही अभिमन्यू आणि लतिकामध्ये वारंवार वेगवेगळ्या कारणांवरून भांडणं होत आहेत. लतिका सध्या तिच्या माहेरी राहत असल्याचं दिसतंय. सध्याच्या घडीला वास्तवातही घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे. मालिकांमध्येही त्याचं प्रतिबिंब उमटलेलं दिसतं. घटस्फोटासारखा गंभीर विषय मालिकांमध्ये संवेदनशीलतेनं हाताळला जात असून त्यातील विविध कंगोरे प्रेक्षकांना दाखवले जातात, असं तज्ज्ञांचं मत आहे.

टीव्हीविश्वात आजवर अनेक मालिकांचे घटस्फोटाचे ट्रॅक गाजले आहेत. ‘बालिका वधू’, ‘फिरंगी बहू’, ‘दिया और बाती हम’, ‘बडे अच्छे लगते है’ या बहुचर्चित हिंदी मालिकांमध्येही जोडप्यांचा वेगळं होण्याच्या ट्रॅकला पसंती मिळाली होती. काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘अवंतिका’ या लोकप्रिय मालिकेतल्या घटस्फोटाच्या कथानकानं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. तर अलीकडच्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेतील घटस्फोटाचं नाट्य चर्चेचा विषय ठरलं होतं. आत्मविश्वासानं वावरत असलेली नायिका प्रेक्षकांना बघायला आवडते.

अधिकाराचा योग्य वापर
घटस्फोट ही एक दुर्दैवी घटना आहे. पण या गोष्टीचा दुसऱ्या बाजूनेही विचार होऊ शकतो. आयुष्यभर मन मारून न पटणाऱ्या माणसाबरोबर राहण्यापेक्षा घटस्फोट हा कायद्यानं आखून दिलेला एक पर्याय आहे. या अधिकाराचा वापर करणं योग्य आहे. न्यायालयीन समुपदेशकांनी कार्तिक आणि दीपाला एक महिना एकत्र राहायला सांगितलं आहे. त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा हा प्रयत्न आहे. आता हा घटस्फोट नक्की होतो का नाही, हे पुढील भागांतून उलगडत जाणार आहे.
-अभिजित गुरू, लेखक, रंग माझा वेगळाअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#अधकरच #यगय #वपर #मरठ #मलकत #घटसफटच #वर

RELATED ARTICLES

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा

CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना...

Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात

<p>Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Most Popular

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

भारतीय महिला बुद्धिबळपटूंची प्रगती अधोरेखित!; ऑलिम्पियाडमधील पहिल्या पदकाबाबत प्रशिक्षक अभिजित कुंटे यांचे मत

अन्वय सावंत मुंबई : गेल्या वर्षी जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्यांदा रौप्यपदक जिंकण्यापाठोपाठ यंदा बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय महिला संघाने प्रथमच कांस्यपदकाची कमाई...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक

मुंबई, 12 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बसच्या या आठवड्यात भापज नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा...

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...