Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या अजित पवार काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास देत होते, पटोलेंच्या आरोपावर उपमुख्यमंत्री म्हणाले....

अजित पवार काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास देत होते, पटोलेंच्या आरोपावर उपमुख्यमंत्री म्हणाले….


Maharashtra Political Crisis : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे एकीकडे राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. या आरोपावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवार हे काँग्रेसच्या आमदारांना त्रास द्यायचे, निधी देत नसत असा आरोप नाना पटोले यांनी केला होता.  यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत आपली भूमिका स्पष्ट केली. 

नाना पटोलेंना अजित पवारांचं उत्तर-
आमच्या पक्षाची भूमिका आघाडी सरकार टिकवण्याची आहे. आमचे सर्व आमदार सोबत आहेत. काही आमचे मित्रपक्ष म्हणतात अजित पवारांनी निधी दिला नाही वगैरे.. सरकार गेल्या अडीच वर्षात काम करतंय..तिन्ही पक्षाचे पालकमंत्री आहेत, कोणाबाबतही दुजाभाव केला जात नाही.. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका आहे. 170 आमदारांच्या पाठिंब्यावर हे सरकार आलं होतं. पवार साहेबांनी पुढाकार घेतला, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस असे सर्व एकत्र येऊन हे सरकार अस्तित्वात आलं.  

नाना पटोले काय म्हणाले होते ?
शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, “अजित पवार हे आपल्याला निधी देत नाहीत, त्रास देतात अशा प्रकारच्या तक्रारी शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आल्या, तशाच तक्रारी काँग्रेसच्या आमदारांनीही आपल्याकडे केल्या होत्या असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यानंतर मी शरद पवार आणि अजित पवारांना भेटलो आणि त्यासंबंधीचा भूमिका स्पष्ट केली असल्याचंही त्यांनी म्हटलं.” काँग्रेस पूर्ण ताकतीने शिवसेनेच्या मागे उभी राहिल असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की, “आम्हाला सत्तेचा कोणताही मोह नाही, त्यामुळे जनेतेसाठी आम्ही लढत राहू. महाविकास आघाडीसोबत काँग्रेस राहिल. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नाही तर ईडीच्या भीतींमुळे बंडखोर आमदांरांनी हे पाऊल उचललं असून त्यामागे भाजप आहे. हे सरकार पाच वर्षे चालेल. भाजप सत्तेसाठी कोणत्या थराला जातं हे देशातील जनतेला पाहू द्या.”

उद्धव ठाकरेंना आमचा पाठींबा – अजित पवार
बैठकीला सर्व आमदार, खासदार, मंत्री उपस्थित होते. काही व्हीसीवरुन तर काही प्रत्यक्ष हजर होते. महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरेंना आमचा खंबीर पाठिंबा आहे. शेवटपर्यंत संघर्ष करत राहू, सरकार टिकण्यासाठी प्रयत्न करणार, मी दुपारीही मुख्यमंत्र्यांशी बोललो. आताही बोललो. यापेक्षा दुसरी कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही. ही आमची अधिकृत भूमिका असेल. प्रसारमाध्यमांनी इतर कोणत्याही वृत्तवर विश्वास ठेवू नये.  शिवसेनेबाबत जे काही निर्माण झालं आहे ते त्यांचे प्रवक्ते सांगतील.. सेनेचे काही आमदार परत आले आहेत.. त्यांनी आपली आपबिती सांगितली आहे, असेही अजित पवार म्हणाले. 

शिवसेनेचा वेगळी भूमिका असू शकते – अजित पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी खासदार, आमदारांची बैठक घेतली. राजकीय परिस्थिती निर्माण झालीय त्यावर चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याचा निर्णय झालाय. तसेच काम सुरुच ठेवण्याचे आदेश त्यांनी दिलाय. परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. याशिवाय दुसरी कोणतीच भूमिका आमची नाही, मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी उभे राहणार आहोत. शिवसेनेचा वेगळी भूमिका असू शकते. काही आमदार परतत आहेत, तेथील आमदारांना मुख्यमंत्री यांनी आवाहन केलंय.  

राऊतांच्या वक्तव्यावर काय म्हणाले अजित पवार?
संजय राऊत यांच्या ‘ ..तर महाविकास आघाडीतून बाहेर’ पडण्याच्या विधानावर अजित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, कदाचित आमदारांना परत बोलावण्यासाठी सुद्धा तसं विधान केलेलं असावं.  संजय राऊत जे बोलले तेच ठाकरे यांच्या मनात आहे का हे विचारू.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अजत #पवर #कगरसचय #आमदरनह #तरस #दत #हत #पटलचय #आरपवर #उपमखयमतर #महणल

RELATED ARTICLES

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

‘हे’ दोन खेळाडू टीम इंडियाच्या कॅप्टन्सीचे दावेदार, रोहित शर्माचा पत्ता कट होणार?

मुंबई : रोहित शर्माकडे कॅप्टन्सी जास्त वेळ राहणार नाही अशी एक चर्चा सध्या सुरू झाली आहे. टीम इंडियामध्ये रोहित शर्माला कॅप्टन्सीसाठी टफ देणारे...

देहविक्री करून सैन्याला आर्थिक मदत करताहेत या महिला; काय आहे नक्की प्रकरण? वाचा

खार्किव : Ukraine Women:अनेक वेळा महिलांना बळजबरीने देहविक्री करावी लागते. आपल्या सन्मानाला सौदा करणे इतके सोपे नाही. अनेक महिलांना या परिस्थितीला मजबूरीने सामोरे...

Most Popular

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

पकडलेला लश्करचा दहशतवादी निघाला भाजपचा सदस्य?, नेत्याने म्हटले…

काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी दोन दहशतवाद्यांना अटक केलीय. आता या अटकेवरून राजकारण सुरू झालं आहे. एक दहशतवादी हा भाजपशी संबंधित असल्याचा आरोप केला जातोय....

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्याचा एकाच महिन्यात येतो दोनदा बर्थडे, काय आहे हे गुपित?

मुंबई 04 जुलै: मिर्झापूरमध्ये एका गँगस्टरच्या रूपात आलेले बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) सध्या एकदम प्रकाशझोतात असतात. ज्या वयात लोक रिटायरमेंट कडे...