Thursday, July 7, 2022
Home करमणूक अजय-अतुलमुळे झाला होता 'पुष्पा'फेम गायकाचा बॉलिवूड डेब्यू

अजय-अतुलमुळे झाला होता ‘पुष्पा’फेम गायकाचा बॉलिवूड डेब्यू


मुंबई 19 मे- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असणारा गायक सिड श्रीराम (Sid Sriram) आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.  अत्यंत गोड आणि जादुई आवाज असणाऱ्या सिडचा चाहतावर्ग फक्त तमिळ, तेलगू भाषिकांपुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातसुद्धा त्याची गाणी आवर्जून ऐकली जातात.

तरुणाईला भुरळ पाडलेल्या या गायकाचा जन्म अमेरिकेत झाला. देशाबाहेर मोठा झालेला असूनही सिड आवर्जून हिंदी आणि चक्क मराठी गाणी सुद्धा ऐकतो. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सिडने त्याच्या आवडत्या बॉलिवूड गाण्यांबद्दल खुलासा केला होता. प्यासा या जुन्या आणि प्रसिद्ध चित्रपटाची गाणी तसंच ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या ताल या चित्रपटाची गाणी त्याला आवडतात. मराठी गाण्यांमध्ये विशेष करून कुमार गंधर्वांचं उठी उठी गोपाळा गाणं त्याला भावतं.

सिडने नुकतीच मराठी इंडियन आयडलच्या सेटवर हजेरी लावली होती. त्याने बॉलिवूडमध्ये झुंड (Jhund) या चित्रपटातून गायक म्हणून पदार्पण केलं तुम्हाला माहित आहे का या चित्रपटाची ऑफर संगीतकार अजय-अतुल यांनी स्वतःहून त्याला दिली. सिड यावर सांगतो, “मला अजय-अतुल यांच्याकडून कॉल आला होता. त्यांना पहिल्यांदा भेटल्यावरच मला जाणवलं की ते माणूस म्हणून खूप उत्तम आहेत. माझं बॉलिवूड पदार्पण मला एका महत्त्वाच्या, चांगल्या प्रोजेक्ट मधून व्हावं असं वाटत होतं. माझ्या कामाबद्दल लोकांना अभिमान वाटावा अश्या प्रोजेक्टचा भाग होणं खूप गरजेचं होतं. ते मला झुंड मधून मिळालं.”

हे ही वाचा- महात्मा गांधींच्या आयुष्यावर बनणार वेब सीरिज, प्रतीक साकारणार बापूंची भूमिका

सिड श्रीरामने काही वर्षांपूर्वी अप्सरा आली (apsara ali) गाण्याचा एक विडिओ पोस्ट करुन सगळ्यांची मनं जिंकली होती. सिडच्या अनेक गाण्यांचे मराठी चाहते ह्या गाण्यांनंतर त्याच्या मराठी पदार्पणाबद्दल देखील विचारणा करत होते.

“मला लवकरच म्हणजे अगदी येत्याच वर्षात मराठी गाणं गायला मिळावं ते अजय अतुल यांचं असावं,” अशी इच्छा सिड श्रीरामने व्यक्त केली.

सिडचं पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली (Srivalli) गाणं तुफान वायरल झालं होतं. ए.आर रहमान च्या अदिये गाण्यातून त्याच्या करिअरची सुरवात झाली. सिड श्रीरामचा जन्म चेन्नईमध्ये झाला असून त्यानंतर लगेचच तो अमेरिकेला गेला. त्याची आई त्याची पहिली गुरु असल्याचं तो सांगतो. द हिंदू सोबतच्या मुलाखतीत त्याने लहानपणीचे आणि त्याच्या सुरवातीच्या काळातले बरेच अनुभव सांगितले आहेत.

Published by:Rasika Nanal

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#अजयअतलमळ #झल #हत #पषपफम #गयकच #बलवड #डबय

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

संविधान विरोधी वक्तव्य केलं आणि मंत्रिपद गमावलं

"मी राजीनामा दिला आहे आणि तो माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी कधीही संविधानाची बदनामी केली नाही", अशी प्रतिक्रिया या मंत्र्यांने दिली आहे.  अस्वीकरण: ही...

अजमेर दर्ग्याचे खादीम सलमान चिश्ती यांना अटक; नुपूर शर्मांचा शिरच्छेद…

अजमेर: अजमेर दर्ग्याचे खादिम सलमान चिश्ती यांना अखेर अटक करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात भडकावणारे भाषण दिल्याबद्दल...

WhatsApp युजर्स सावधान! यूकेमध्ये नोकरी आणि फ्री व्हिसाचं आमिष दाखवून फसवणूक

नवी दिल्ली, 06 जुलै : हल्ली ऑनलाइन फ्रॉडचं (Online Fraud) प्रमाण खूप वाढलंय. सायबर गुन्हेगार मेसेज किंवा कॉलद्वारे लोकांची फसवणूक करून पैसे लांबवतात....

शिंदे-फडणवीसांची वक्तव्ये म्हणजे बाजारातील ‘उधारीचा माल’, ‘सामना’तून पुन्हा टीका

मुंबई, 6 जुलै : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यादिवसापासून शिंदे-शिवसेना यांच्यात शाब्दिक यु्द्ध सुरु झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...

Hemangi Kavi: ‘काय तमाशा लावलाय?’ हेमांगी कवीच्या नव्या लूकची होतेय चर्चा

मुंबई: अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे. अभिनेत्रीच्या विविध पोस्ट चर्चेत असतात. आता हेमांगीने 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवरील...

Video शिंदे- भाजप सरकार येताच, भास्कर जाधव लागले शेतीच्या कामाला

चिपळून, 6 जुलै : विधानभवनात बहुमत चाचणीदरम्यान शिवसेनेच्या (Shivsena) वतीने आक्रमक बोलणारे भास्कर जाधव  (Bhaskar Jadhav) सत्तांतरानंतर आपल्या गावाकडील शेतीत रमले आहे. विधानसभेचे...