Saturday, July 2, 2022
Home भारत अग्निपथ योजनेच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चा आक्रमक, आज ठिकठिकाणी करणार आंदोलन 

अग्निपथ योजनेच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चा आक्रमक, आज ठिकठिकाणी करणार आंदोलन 


Samyukta Kisan Morcha Protest : लष्कर भरतीसाठी केंद्र सरकाकडून घोषणा करण्यात आलेल्या नवीन अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) देशभरातून विरोध होत आहे. ठिकठिकाणी याविरोधात आंदोलनं केली जात आहेत.  देशभरातील युवक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात आता संयुक्त किसान मोर्चानं देखील एन्ट्री केली आहे. संयुक्त किसान मोर्चाने आता अग्निपथ योजनेच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे. संयुक्त किसान मोर्चाचे लोक आज देशाच्या अनेक भागात या योजनेला विरोध करत आंदोलन करणार आहेत.

राजकीय पक्ष देखील अग्निपथ योजनेविरोधात

अग्निपथ योजनेविरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन गोंधळ घातला आहे. याविरोधात अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. त्यानंतर राजकीय पक्षांनी देखील या योजनेविरोधात आवाज उठवला आहे. आता शेतकरी संघटनांशी संबंधित लोकांनी देखील अग्निपथ योजनेच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. शेतकऱ्यांशी संबंधित संयुक्त किसान मोर्चा आज देशभरात निदर्शने करणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात याच संयुक्त किसान मोर्चानं दिल्लीच्या सिमेवर वर्षभर आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर हे तिनही कृषी कायदे रद्द करण्यात आलं होते.

संयुक्त किसान मोर्चा अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरातील जिल्हा आणि तहसील मुख्यालयाच्या बाहेर 20 जूनला आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिली होती. हे आंदोलन यशस्वी युवक, राजकीय पक्ष आणि सर्वसामान्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन देखील संयुक्त किसान मोर्चानं केलं आहे. यापूर्वी 30 जून रोजी अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करण्याची माहिती देण्यात आली होती. दुसरीकडे अग्निपथ योजनेच्या विरोधात विरोधकही एकवटले आहेत. दोन दिवसांपूर्वी पाटण्यात महाआघाडी रस्त्यावर उतरली होती. ही योजना रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसनेही हा मुद्दा लावून धरला आहे. जंतरमंतरवर सातत्यानं धरणे आंदोलन सुरु आहे. आता छत्तीसगड काँग्रेसनेही आंदोलनाची तयारी केली आहे. दरम्यान, बिहारमधील सत्ताधारी पक्ष भाजप आणि जेडीयूमध्ये अग्निपथ योजनेवरुन अजूनही वाद सुरुच आहे. अग्निपथ योजनेबाबत जेडीयूच्या भूमिकेवर बिहारचे ऊर्जामंत्री बिजेंद्र यादव म्हणाले, की आमची भाजपसोबत युती आहे. आम्ही गुलामगिरीत नाही. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी अग्निपथ योजनेला विरोध दर्शवला होता. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटनाही घडल्या असल्याचे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अगनपथ #यजनचय #वरधत #सयकत #कसन #मरच #आकरमक #आज #ठकठकण #करणर #आदलन

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

बर्मिंगहॅम कसोटी: मैदानात उतरण्याआधीच टीम इंडियाला दिसतोय पराभव; हे आहे कारण

बर्मिंगहॅम: भारतीय क्रिकेट संघ आज इंग्लंडविरुद्ध पाचवी कसोटी खेळणार आहे. दोन्ही संघात गेल्या वर्षी पाच सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. पण चौथ्या कसोटीनंतर...

Maharashtra Politics : शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या मुंबईत येणार; रविवारी विधीमंडळाचे विशेष अध

Maharashtra Politics : जवळपास मागील 10 दिवसांपासून राज्याबाहेर असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या, 2 जुलै रोजी मुंबईत दाखल...

VIDEO:अंकिता लोखंडेने ‘क्यूंकी सास भी बहू थी’स्टाईलमध्ये दाखवली नव्या घराची झलक

मुंबई, 1 जुलै-   छोट्या पडद्यावरील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी (TV Actress) एक अशी अंकिता लोखंडेची  (Ankita Lokhande) ओळख आहे. अंकिता सतत कोणत्या ना कोणत्या...

कन्हैया लाल हत्याकांडानंतर राजस्थान सरकारचा मोठा निर्णय, 32 IPS अधिकार्‍यांची बदल्या

Rajasthan IPS Transfer : उदयपूरमधील कन्हैया लाल हत्याकांडानंतर राजस्थानमधील वातावरण तापलं आहे. या घटनेनंतर राजस्थान सरकारनं मोठा निर्णय...

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -  Dharmaveer : 'धर्मवीर' ठरला 2022 मधला सर्वात मोठा...

5G Smartphones: नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याआधी ही लिस्ट एकदा पाहाच, सुरुवातीची किंमत ८,९९९ रुपये

नवी दिल्ली: Budget 5G Smartphone: जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि बजेट कमी असेल तर, आज आम्ही तुम्हाला १५ हजारांखालील टॉप ५...