Saturday, August 20, 2022
Home विश्व अखेर Bermuda Triangle चं रहस्य उलगडलं? प्रसिद्ध शास्त्रज्ञाचा दावा की...

अखेर Bermuda Triangle चं रहस्य उलगडलं? प्रसिद्ध शास्त्रज्ञाचा दावा की…


ऑस्ट्रेलिया : Bermuda Triangle च्या परिसरात विमान आणि जहाजं गायब झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान आजपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. मात्र आता एका शास्त्रज्ञाने दावा केला आहे की, त्यांनी बर्म्युडा ट्रँगलचं गूढ उकललं आहे. बर्म्युडा ट्रँगलबद्दल जी अलौकिक शक्ती सांगितली जाते ती खरी नाही, असं या शास्त्रज्ञाचे म्हणणं आहे.

कार्ल क्रुझेल्निकी यांनी सिद्धांत मांडला आहे की, त्यामागे कोणतंही रहस्य नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, बर्म्युडा ट्रँगलमधून शोध न घेता गायब होणारी विमानं आणि जहाजांचा एलियन किंवा हरवलेल्या अटलांटिस शहराशी काहीही संबंध नाही.

कार्ल क्रुझेलनिकी हे ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ आहेत. मिरर यूकेच्या म्हणण्याप्रमाणे, बर्म्युडा ट्रँगलमधून मोठ्या संख्येने विमानं आणि जहाजं गायब होण्याचं कारण मानवी दोष, खराब हवामान याशिवाय दुसरं काही नाही, असा त्यांचा विश्वास आहे.

ते पुढे म्हणतात की, हा भाग विषुववृत्ताच्या जवळ आहे आणि जगातील सर्वात श्रीमंत देश अमेरिकेच्या जवळ आहे. या भागात मोठ्या प्रमाणात रहदारी असते. 

लॉयड्स ऑफ लंडन आणि यूएस कोस्टगार्डच्या मते, बर्म्युडा ट्रँगलमधील हरवलेल्या वस्तूंची संख्या टक्केवारीच्या दृष्टीने उर्वरित जगातील हरवलेल्या वस्तूंच्या संख्येइतकी आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीचे फेलो क्रुझेलनिकी म्हणतात की, जे विमान बेपत्ता झाल्यानंतर बर्म्युडा ट्रँगलबद्दल चर्चा सुरू झाली, त्याच्या गायब होण्याबद्दल काही साध्या गोष्टी असू शकतात. ते 5 यूएस नेव्ही टीबीएम एव्हेंजर टॉर्पेडो बॉम्बर्सचं फ्लाइट होती. 5 डिसेंबर 1945 रोजी, फ्लाइटने अटलांटिकवरील फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडामधून उड्डाण केलं. 

तळाशी असलेला रेडिओ संपर्क तुटल्याने विमानं गायब झाली होती. त्याचा किंवा त्याच्या 14 क्रू मेंबर्सचा शोध लागला नाही. या विमानांचा शोध घेण्यासाठी आणखी एक पलटण पाठवण्यात आली होती, पण तीही परत आली नाही. 

1964 मध्ये लेखक व्हिन्सेंट गॅडिसने ‘द डेडली बर्म्युडा ट्रँगल’ नावाच्या लेखात आपला सिद्धांत प्रकाशित केला तेव्हा बर्म्युडा ट्रँगलबद्दल चर्चा अधिकत वाढली. मात्र क्रुझेलनिकी यांनी याबाबत वेगळा विचार केलाय.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अखर #Bermuda #Triangle #च #रहसय #उलगडल #परसदध #शसतरजञच #दव #क

RELATED ARTICLES

शंख मुद्रा केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात होते वाढ, ही आहे योग्य पद्धत

शंख मुद्रा करायला खूप सोपी आहे आणि त्याचा नियमित सराव केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन शांत राहते. ही मुद्रा सर्व वयोगटातील...

औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा

Aurangabad Bhondubaba : मंडळी कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याने तुमचे दुर्धर आजार बरे होतात असं म्हटलं तर आपण...

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

Most Popular

आता UKमध्येही सुरू होणार UPI सेवा! हजारो भारतीय विद्यार्थांना होणार फायदा

मुंबई, 19 ऑगस्ट: यूपीआयच्या माध्यमातून भारतात डिजिटल इंडिया अभियानाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये यूपीआय आयडी किंवा कोड स्कॅन करण्याच्या...

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

CM Eknath Shinde Dahi handi Special Report : जिथे जिथे हंडी, तिथे तिथे मुख्यमंत्री!

<p>CM Eknath Shinde Dahi handi Special Report : जिथे जिथे हंडी, तिथे तिथे मुख्यमंत्री! शिंदे गट आणि भाजपकडून दहीहंड्या हायजॅक</p> अस्वीकरण: ही कथा किंवा...

भारत-झिम्बाब्वे एकदिवसीय मालिका : राहुल सलामीला उतरणार?; झिम्बाब्वेविरुद्धच्या उर्वरित एकदिवसीय मालिकेत भारताची नवी रणनीती

पीटीआय, हरारे : झिम्बाब्वेविरुद्ध शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार केएल राहुलला फलंदाजीची संधी मिळेल अशी आशा आहे. याचप्रमाणे उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांत...

‘आज ‘मुरलीधराचा’ सण आणि…’ सुबोधला मिळाले खास आशीर्वाद

मुंबई, 19 ऑगस्ट : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सध्या कायम चर्चेत आहे. त्याचा 'बस बाई बस' या कार्यक्रमाची सध्या प्रचंड चर्चा आहे....