Friday, August 12, 2022
Home करमणूक अखेर बाप-लेकीची होणार भेट? अभिजीत खांडकेकरच्या भूमिकेत येणार मोठा ट्विस्ट

अखेर बाप-लेकीची होणार भेट? अभिजीत खांडकेकरच्या भूमिकेत येणार मोठा ट्विस्ट


मुंबई: ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. यामध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या (Abhijeet Khandkekar) भूमिकेचं कौतुक होतंय. मालिकेत सध्या उत्कंठावर्धक वळण आलं आहे. मालिकेमध्ये स्वरा आणि तिच्या बाबांची भेट होणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. साईबाबांच्या मंदिरात स्वरा आणि तिचे बाबा एकत्र येतात. ते एकत्र येतात खरे; पण बापलेकीची भेट होते का ते बघणं रंजक ठरणार आहे.

मालिकेतील चिमुकल्या स्वराने काहीच दिवसांपूर्वी तिच्या आईला गमावलं आहे. आईच्या जाण्याचं दु:ख पचवत तिने मुंबई गाठली असून वडिलांचा शोध घेण्यासाठी ती प्रयत्न करतेय. याशिवाय तिला जगण्यासाठी देखील विशेष कष्ट सहन करावे लागत आहेत. राहण्यासाठी अन् पोट भरण्याासाठी तिला विशेष धडपड करावी लागते आहे. दरम्यान योगायोगाने ती आणि तिचे बाबा साईमंदिरात एकत्र येतात. पण इथे त्यांची भेट होणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

हे वाचा-प्रेमाचे परिणाम भोगावेच लागतात, मलायकाबरोबरच्या नात्याविषयी अर्जुन कपूर बोलला बरंच काही!

ठाणे वर्तक नगर येथील प्रतिशिर्डी मानल्या जाणाऱ्या साईबाबा मंदिरात हा खास प्रसंग चित्रित करण्यात आला आहे. या प्रसंगासाठी संपूर्ण टीमनं विशेष मेहनत घेतली असून जास्तीत जास्त खऱ्या जागांचा वापर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या प्रसंगासाठी एक खास गाणं बनवण्यात आलं आहे. ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद’ फेम स्वरा बनसोडेनं हे गाणं गायलं असून कौशल इनामदारनं ते संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याचे शब्द हेमंत सोनावणे आणि दीप्ती सुर्वे यांच्या लेखणीतून उतरले आहेत.

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेने अल्पावधीतच मोठा प्रेक्षकवर्ग कमावला आहे. मालिका मे महिन्यात सुरू झाली होती, काहीच महिन्यात या मालिकेने टीआरपी रेटिंगच्या यादीत टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळे प्रेक्षक या मालिकेतील प्रत्येक अपडेटविषयी नेहमीत उत्सुक असतात. मात्र स्वराच्या आयुष्यात दाखवले जाणारे वाईट प्रसंग पाहून प्रेक्षकांनी मालिकेला ट्रोल देखील केले आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#अखर #बपलकच #हणर #भट #अभजत #खडककरचय #भमकत #यणर #मठ #टवसट

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

Most Popular

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

कला विश्वात शोककळा, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायकाचं निधन

नवी दिल्ली : कला विश्वात सध्या मोठ्या घटना घडत आहेत. सगळ्यांना खळखळून हसवणारे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू...

सुपर चषक फुटबॉल : रेयाल माद्रिदला जेतेपद; अलाबा, बेन्झिमाच्या गोलमुळे एनट्रॅक फ्रँकफर्टवर मात

एपी, हेलसिंकी : डेव्हिड अलाबा आणि कर्णधार करीम बेन्झिमा यांनी केलेल्या गोलच्या बळावर स्पॅनिश संघ रेयाल माद्रिदने जर्मन संघ एनट्रॅक फ्रँकफर्टवर २-० अशी...

मुंबईकरांनो सावधान! शहरात एका दिवसात 79% कोरोनाचे रुग्ण वाढले

 आरोग्य विभागाच्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

2023 मध्ये बेबी पावडर उत्पादनावर बंदी आणणार, जॉनसन अँड जॉनसन कंपनीचा मोठा निर्णय, ‘हे’ आहे कारण

Johnson and Johnson Baby Talc : जॉनसन अँड जॉनसन (Johnson and Johnson) कंपनीने बेबी पावडर उत्पादन बंद करण्याचा मोठा...